आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 08:09 AM2023-09-07T08:09:34+5:302023-09-07T08:10:02+5:30

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Rain will increase in the state from today, happy atmosphere among farmers! | आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

googlenewsNext

गेल्या अनेक दिवसापासून राज्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आता पुन्हा राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस होत आहे. राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज विदर्भातील काही भागात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे अनेक भागात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं असून हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे दिसत असल्याने पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे.

Web Title: Rain will increase in the state from today, happy atmosphere among farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.