कोकणात परतणार पाऊस
By admin | Published: July 7, 2015 01:56 AM2015-07-07T01:56:53+5:302015-07-07T01:56:53+5:30
अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होईल.
पुणे : अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होईल. पण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयात मात्र १२ जुलैपर्यंत पाऊस पडणार नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोकणवगळता राज्यात पाऊस परण्याची चिन्हे नसल्याने दुबार पेरणीचे संकट आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात कोठेही मॉन्सून सक्रिय नाही. त्यामुळे गेल्या २४ तासांत राज्यात कोठेही पाऊस झालेला नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडतो. पण सध्या अशी कोणतीही स्थिती नाही. त्यामुळे पूर्ण राज्यातून पाऊस गायब झाला आहे. पण अरबी समुद्रात केरळपासून गुजरातपर्यंत किनारपट्टीच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा हळूहळू सक्रिय होत आहे. त्यामुळे बुधवारपासून कोकणात पुन्हा पावसास सुरूवात होईल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल, असे डॉ. खोले म्हणाल्या.
...तर, दुबार पेरणीची शक्यता !
च्राज्यात ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून ८ दिवस पावसाने ओढ दिल्याने पेरण्या थांबल्या आहेत. ४/५ दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची शक्यता आहे, अशी माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.
च्पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागात खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. सरासरीपेक्षा कमी, ८८ टक्के पाऊस होईल असा नवा अंंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला होता. शेतकऱ्यांनी जमीनीत पुरेशा ओलाव्याची खात्री करुनच पेरण्या कराव्यात, त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार नाही असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट के ले होते.
च्राज्यात खरिपाचे ऊस वगळता १ कोटी ३० लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ४/५ दिवसांत पाऊस न झाल्यास कोणती पीके घ्यायला लागतील त्याचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय कृषी संचालकांना दिल्या असल्याचे देशमुख म्हणाले.
महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी साधारणत: १५ जुलैनंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस पडेल.
- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालिका, भारतीय हवामानशास्त्र विभाग