मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांना रेनकोट वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 02:19 AM2019-06-20T02:19:23+5:302019-06-20T02:19:45+5:30
८० हजार रेनकोटचे वितरण; ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंसेवकांना भेट
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून जाणाºया वारकऱ्यांना आता पावसात भिजावे लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांना रेनकोट भेट दिले.
आतापर्यंत सुमारे ८० हजार रेनकोटचे वितरण विविध पालख्यांमधील वारकरी बांधवांना करण्यात आले असून एकूण साडेपाच लाख रेनकोटचे वितरण पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी करण्यात येत आहे. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो स्वयंसेवकांनी या रेनकोटच्या वितरणाची मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या वर्षी प्लास्टिकबंदीमुळे पावसापासून बचाव करायला हे प्लास्टिक वापरले तर कारवाई होईल, अशी भीती त्र्यंबकेश्वरमध्ये श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकºयांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्याकडे बोलून दाखविली. भारतीय यांनी तिथूनच हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. त्यांनी वारीपुरती प्लास्टिकबंदी उठविली व वारकºयांचा पावसापासून बचाव करण्यासाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे मनावर घेतले. वारकºयांची सेवा करण्याच्या परंपरेचा एक भाग म्हणून त्या बाबत खारीचा वाटा उचलला.
पालखीच्या ठिकाणी करणार वाटप
श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी, मोहम्मद शहा बाबांची पालखी, मध्य प्रदेशातून येणारी श्री भाकरे महाराज पालखी, एकनाथबाबा पालखी; देवगड आदी ठिकाणी रेनकोटचे वितरण करण्यात आले. श्री तुकोबा, श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.