कोलंबोमध्ये पावसाचा कहर, केरळमध्येही मुसळधार
By Admin | Published: May 18, 2016 04:18 AM2016-05-18T04:18:57+5:302016-05-18T04:18:57+5:30
श्रीलंकेत पावसाने कहर केला असून, कोलंबो आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
कोलंबो : श्रीलंकेत पावसाने कहर केला असून, कोलंबो आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांत येथे ११ जणांचा बळी गेला आहे, तसेच सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. येत्या काळात श्रीलंकेसह भारतात केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी येथेही पावसाचा कहर होण्याचा अंदाज आहे. केरळच्या मध्य आणि दक्षिणेकडील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने तटवर्ती भागांमध्ये प्रचंड नुकसान झाल्याचे वृत्त आहे. कोची, अलापुळा आणि एर्नाकुलम या तटवर्ती जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला.
या भागात शेकडो घरे कोसळली. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच बरसलेल्या या मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने लोकांना मदत शिबिरांत पाठविण्यात आले आहे.