कोकण, मध्य महाराष्ट्रातच पावसाचा जोर, मराठवाडा, विदर्भाकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 01:12 PM2019-07-09T13:12:15+5:302019-07-09T13:14:50+5:30
पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
पुणे : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातच पावसाने सध्या धुमाकूळ घातला असून, कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला़. मराठवाडा व विदर्भाकडे पावसाने पाठ फिरविली असून, तेथे अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे़. पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
गेल्या २४ तासांत जव्हार, खालापूर, माथेरान, संगमेश्वर, देवरुख, विक्रमगड ७०, वाल्पोई ६०, बेलापूर, चिपळूण, खेड, माणगाव, मुंबई ५०, कर्जत, महाड, राजापूर, रोहा, सावंतवाडी, श्रीवर्धन, सुधागड, पाली, वैभववाडी ४०, दोडामार्ग, लांजा, मुल्दे, पेडणे, पोलादपूर, फोंडा, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, वाडा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती़. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़. मध्य महाराष्ट्रात चांदगड, राधानगरी, सिन्नर ८०, जावळी मेधा, ओझर, पन्हाळा, शाहुवाडी, वेल्हे ७०, इगतपुरी, पाटण, सुरगाणा ६०, आंबेगाव, गारगोटी ५० मिमी पाऊस झाला़ .
मराठवाड्यातील अंबेजोगाई, मोमिनाबाद, औसा, मनवत, पाथरी, सोयेगाव २०, गेवराई, कन्नड, मांजलगाव, सिल्लोड, वैजापूर, वडवाणी १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात बुलढाणा ३०, भामरागड, धनोरा, एटापल्ली, कोर्ची, मोहाडी, मुलचेरा २०, अकोट, अजुर्नी मोरगाव, आरमोरी, बालापूर, बार्शी टाकळी, भिवापूर, ब्रम्हपुरी, चिखली, देवळी, धारणी, घाटंजी, गोंदिया, खामगाव, कुरखेडा, लाखंदूर, मालेगाव, मारेगाव, मोताळा, पांढरकवडा, पातूर, सडक, अजुर्नी, सकोली, सलेकसा, सावनेर, शेगाव, सिरोंचा, वारोरा, यवतमाळ १० मिमी पाऊस झाला होता़.
सोमवारी दिवसभरात पुणे २६, महाबळेश्वर ७९, कोल्हापूर ७, जळगाव ९, नाशिक ७, सातारा ११, सोलापूर ५, मुंबई १५, सांताक्रुझ १२२, अलिबाग ३९, रत्नागिरी ११, पणजी ४, डहाणु १, औरंगाबाद ४, बुलढाणा १०, गोंदिया १३, नागपूर ५, वाशिम २ मिमी पाऊस झाला आहे़.
९ ते ११ जुलै दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता़ १२ जुलैला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बºयाच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता़
इशारा : ९ जुलैला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस़ १० ते १२ जुलै दरम्यान कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा़
़़़़़़़़़़
गेल्या २४ तासांत झालेला पाऊस
कोयना (नवजा) ३४०, तलासरी २२०, त्र्यंबकेश्वर २००, शिरगाव १९०, ओझरखेडा १७०, महाबळेश्वर १४०, हसुल, ताम्हिणी, दावडी १३०, लोणावळा, पौड मुळशी, पेठ १२०, डुंगरवाडी, आजरा, गगनबावडा, लोणावळा (कृषी) १००, भिरा, मुंडणगड, मोखेडा, मुरुड, पेण ९० मिमी पाऊस पडला आहे़.