Maharashtra Rain : येत्या ४८ तासांत कोकण, मुंबईत अतिवृष्टी : हवामान खात्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:42 AM2019-09-05T11:42:14+5:302019-09-05T11:42:46+5:30

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने हा पाऊस होत असून याचा जोर पुढील ४८ तास राहणार आहे़.

Rainfall in Kokan, Mumbai in the next 48 hours: Weather department alert | Maharashtra Rain : येत्या ४८ तासांत कोकण, मुंबईत अतिवृष्टी : हवामान खात्याचा इशारा 

Maharashtra Rain : येत्या ४८ तासांत कोकण, मुंबईत अतिवृष्टी : हवामान खात्याचा इशारा 

Next

पुणे : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली़ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून, मुंबईत बुधवारी दिवसभरात अतिवृष्टी झाली़. कोकण, गोव्यात पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .
याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने हा पाऊस होत असून याचा जोर पुढील ४८ तास राहणार आहे़. हा पाऊस संपूर्ण राज्यात होण्याची शक्यता आहे़. त्यानंतर त्याचा जोर कमी होत जाईल़. येत्या २४ तासांत पालघर, मुंबई, ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पुढील चार दिवस पाऊस असणार आहे़. मध्य महाराष्ट्रात पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल़. तसेच पुढील तीन दिवस घाट परिसरात जोरदार पाऊस असेल़ कोल्हापूरला पुढील ५ दिवस पावसाची शक्यता आहे़ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.  मराठवाड्यात ५ ते ८ सप्टेंबरदरम्यान हलका पाऊस असेल़ .
कोकण, गोव्यात सर्वत्र सध्या जोरदार पाऊस पडत आहे़ मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला़. घाटमाथ्यावर सर्वत्र जोरदार पाऊस पडला असून, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़. मराठवाड्यात केज ५०, भूम, वडावणी ४०, आंबेजोगाई, चाकूर, कळंब, परळी वैजनाथ ३० मिमी पावसाची नोंद झाली असून, काही ठिकाणी हलका पाऊस झाला़ विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडला़. 
५ व ६ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ७ व ८ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
.........

बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पडलेला पाऊस
खालापूर २७०, माणगाव, रोहा २६०, डुंगरवाडी २५०, खोपोली उरण २३०, लोणावळा २२०, दावडी २००, भिरा, मुरुड, ठाणे १९०, म्हसळा १८०, बेलापूर, शिरगाव, वळवण १७०, दोडामार्ग, कर्जत १५०, चिपळूण, पनवेल, श्रीवर्धन, सुधागड पाली १४०, पालघर, पेण, पेडणे, वसई, महाबळेश्वर, कोयना १३०, मुंबई (कुलाबा) १२०, शिरोटा, हर्णे, खेड, पोलादपूर, राजापूर, रामेश्वर (कृषी), उल्हासनगर ११०, अंबरनाथ, डहाणू, कणकवली १०० मिमी पावसाची नोंद झाली होती़.
.......
बुधवारी दिवसभरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे २१४, कुलाबा ७१, अलिबाग ११२, रत्नागिरी ४१, पणजी २७, डहाणू २७, महाबळेश्वर ८४, अहमदनगर ३३, वर्धा ३९ मिमी पाऊस झाला आहे़. 
च्इशारा : मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत ५ सप्टेंबरला मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ सप्टेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टी, तर, ६, ७ व ८ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता़
पुणे व सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात ५ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी मुसळधार, तर पुढील तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता़ नंदूरबार, नाशिक, बीड येथे ५ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे़. 
.........

Web Title: Rainfall in Kokan, Mumbai in the next 48 hours: Weather department alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.