कोकणात पावसाचा जोर

By Admin | Published: June 26, 2016 03:17 AM2016-06-26T03:17:41+5:302016-06-26T03:17:41+5:30

कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत

Rainfall of Konkan | कोकणात पावसाचा जोर

कोकणात पावसाचा जोर

googlenewsNext

- जयंत धुळप, अलिबाग

कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत सवार्धिक १९२ मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे झाली आहे. तर शनिवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या केवळ सहा तासांत अलिबाग येथे १४५ मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

ठाणे येथे सर्वाधिक १०७.१ मि.मी. पाऊस
ठाणे जिल्ह्यात ठाणे येथे सर्वाधिक १०७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी कल्याण ३६.५, मुरबाड ३.८, भिवंडी ४३.१, शहापूर २४.३, अंबरनाथ ९.८ तर उल्हासनगर येथे शून्य पावसाची नोंद झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पालघर येथे सर्वाधिक १४२.३ मि.मी. पाऊस
पालघर जिल्ह्यात पालघर येथे सर्वाधिक १४२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी वसई १०९, डहाणू ५१.१, वाडा ४४.३, जव्हार १०, मोखाडा १३, तलासरी २२.५ तर विक्र मगड येथे १७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

अपेक्षित पावसापैकी ११.२९ टक्के पाऊस पूर्ण
रायगड जिल्ह्यात याच २४ तासांत जिल्ह्यात एकूण १,६९७.९० मि.मी. पाऊस झाला असून, हे सरासरी पर्जन्यमान १०६.१२ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकूण पाऊस ३१० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान १९.३८ मि.मी. होते. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण वार्षिक अपेक्षित पावसापैकी ११.२९ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासोत रायगड जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी रोहा १३५, पेण १३५, अलिबाग १३४, सुधागड १३०, माणगांव १२५, श्रीवर्धन ११२, तळा १०७, मुरु ड १०५, महाड १०५, उरण १०२, खालापूर ८३, पनवेल ८०.४०, पोलादपूर ५९, माथेरान ४९, कर्जत ४४.५० मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.

दापोली येथे सर्वाधिक १७३ मि.मी. पाऊस
राज्य कृषी विभागाच्या दैनिक पर्जन्य नोंद व विश्लेषण अहवालानुसार, दापोली येथे सर्वाधिक १७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मंडणगड १५६ ,गुहागर १०९.४, चिपळूण ७९.८८, रत्नागीरी ७९, खेड ६८.६७, लांजा ४०.८०, राजापूर ३८, तर संगमेश्वर येथे ३३ मि.मी. नोंद झाली.

देवगडला सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे १२६ मिमी झाला. उर्वरित ठिकाणी वेंगुर्ला १०७, मालवण ९१, सावंतवाडी ९०, कुडाळ ६३, वैभववाडी २४, कणकवली २२ मि.मी. नोंद झाली.

Web Title: Rainfall of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.