कोकणात पाऊस, तर नाशिकात गारपीट!

By admin | Published: December 12, 2014 02:10 AM2014-12-12T02:10:07+5:302014-12-12T02:10:07+5:30

ऐन हिवाळ्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिलत काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर नाशिक, सातारा या जिलंमध्ये गुरुवारी दुपारी गारपीट झाली़

Rainfall in Konkan, Hail in Nashik! | कोकणात पाऊस, तर नाशिकात गारपीट!

कोकणात पाऊस, तर नाशिकात गारपीट!

Next
नाशिक/सातारा/रत्नागिरी : ऐन हिवाळ्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिलत काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर नाशिक, सातारा या जिलंमध्ये गुरुवारी दुपारी गारपीट झाली़ अवकाळी पाऊस व गारपिटीने हापूस, द्राक्ष, कांदा, खरीपाची ज्वारी, कापूस, हरभ:याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
नाशिक जिलत गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास निफाड, मालेगाव, येवला व देवळा तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपीट झाली़ काही भागांत गारांचे 3 इंचांर्पयत थर साचले होते. अर्धा तास झालेल्या गारपीटीने द्राक्षाच्या घडांना तडे केले. त्यामुळे द्राक्षबागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले. या पावसामुळे गहू, नवीन लागवड केलेली कांदा लागवड, डाळींब पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा जिलतील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग, खटाव तालुक्यातील पुसेगाव, औंधसह परिसरातील गावामध्ये  गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही काळ गारपीटही झाली. हा पाऊस हरभरा पिकासाठी अडचणीचा ठरणार आहे.
कणकवली, वैभववाडीला अवकाळीने झोडपले
सिंधुदुर्ग जिलतील कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यांत गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  तर रत्नागिरी जिलतील लांजा, देवरुख आणि राजापूर या तीन तालुक्यांना गुरुवारी दुपारी जवळपास पाऊण तास अवकाळी पाऊ स झाला़   
दरम्यान, रत्नागिरीच्या विविध भागांत पडलेल्या अवेळी पावसाने हापूस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकाची नासाडी होणार आहे. मोहर गळून गेल्याने यंदा हापूसचे पीक प्रमाण घटण्याची व उशिरा येण्याची शक्यता रत्नागिरीच्या मालगुंड येथील आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्त केली ़ (प्रतिनिधी)
 
धुळ्य़ात वादळी पाऊस
धुळे तालुक्यातील नेर परिसरात रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वादळी वा:यासह पाऊस झाला. कुसुंबा आणि कावठी परिसरात गारपीट झाली. पावसामुळे शेतात कापून ठेवलेले बाजरी, मका आदी पीक खराब होण्याची भीती आहे. वादळामुळे परिसरातील वीजपुरवठाही खंडीत झाला होता. 

 

Web Title: Rainfall in Konkan, Hail in Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.