राज्यासह मुंबईत पावसाची विश्रांती
By admin | Published: September 26, 2015 03:13 AM2015-09-26T03:13:04+5:302015-09-26T03:13:04+5:30
मागील आठवड्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे
मुंबई : मागील आठवड्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. परिणामी पाणीकपातीचे
संकट दूर होण्याची शक्यता आहे; परंतु २१ सप्टेंबरपासून राज्यासह
मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने जलसंकट दूर होण्यासाठी राज्यासह मुंबईची मदार आता परतीच्या पावसावर आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरासह गुजरात, बिहार, आसाम, केरळ
आणि कर्नाटकावर कमी दाबाचे
क्षेत्र निर्माण झाले होते. परिणामी विदर्भ, मराठवाडा, मध्य
महाराष्ट्र आणि कोकणात सरासरी पावसाची नोंद झाली होती. २१ सप्टेंबरपर्यंत पडलेल्या पावसाने
मात्र कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यासह मुंबईतही पावसाचा शिडकावा कमी झाला.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा २५ सप्टेंबर रोजीही कायम आहे.
वातावरणीय बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास खोळंबला असून, येत्या आठवड्याभरात परतीचा
मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने
वर्तवला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील ४८ तासांत आकाश ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)
तलावआजची तलावाची
पातळीखोली
मोडक१६३.०२१६३.१५
तानसा१२८.२२१२८.६३
विहार७७.२४८०.१२
तुळशी१३९.१७१३९.१७
अ. वैतरणा ६००.५९६०३.५१
भातसा१३५.०८१४२.०७
म. वैतरणा २८४.८८२८५