राज्यात पावसाचा दणका

By admin | Published: July 24, 2014 01:37 AM2014-07-24T01:37:44+5:302014-07-24T01:37:44+5:30

महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या पावसाने बुधवारी रौद्ररूप धारण केले. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली त

Rainfall in the state | राज्यात पावसाचा दणका

राज्यात पावसाचा दणका

Next
पुणो : महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या पावसाने बुधवारी रौद्ररूप धारण केले. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. यामुळे विदर्भातील नद्यांना पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिखलदरा येथे सर्वाधिक 28क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यापाठोपाठ महाबळेश्वरमध्ये 25क्, वर्धा व आष्टीमध्ये प्रत्येकी 2क्क् मिमी पाऊस पडला. दरम्यान, मराठवाडय़ाच्या अनेक भागांमध्ये बुधवारी पावसाने हजेरी लावली.  
विदर्भात अमरावती विभागातील अनेक मार्गावर वृक्ष उन्मळून पडले. काही मार्गावर नदीनाले तुडूंब भरून वाहत होते. दक्षतेचा उपाया म्हणून 56 मार्गावरील एसटीच्या फे:या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अप्पर वर्धा धरणातील जलसाठय़ात वाढ झाल्याने दुपारपासून निम्न वर्धा धरणाचे सर्व 31 दारे दीड मीटरने आणि भंडारातील गोसेखुर्द धरणाचे 17 दारे तीन मीटर तसेच 16 दारे अडीच मीटरने उघडण्यात आली.   (प्रतिनिधी)
 
कोकणात इशारा
च्पुढील 48 तासांत कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
कोयना धरणात वीजनिर्मिती सुरू
च्कोयना विद्युत प्रकल्प पाण्याअभावी ठप्प झाला होता. मात्र सद्य:स्थितीत धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने कोयनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती पुन्हा सुरू झाल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली. दरम्यान, 1क्क्क् मेगावॅट वीजनिर्मिती करणा:या चौथ्या टप्प्याकडे बुधवारी पाणी सोडले. 
 
अमरावती : सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. अचलपूर, अंजनगाव-सुर्जी व चांदूर रेल्वे तालुक्यात घराच्या भिंती कोसळून चौघांचा मृत्यू झाला. 
 
मराठवाडय़ात  बीड जिल्हय़ात मंगळवारी रात्री संततधार पाऊस झाला. लातूर शहरासह औसा तालुक्यात बुधवारी रिमङिाम पावसाने हजेरी लावली़ सलग दुस:या दिवशीही उस्मानाबाद शहरासह तेर, लोहारा परिसरामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. मंगळवारी रात्रीपासून परभणीत भिज स्वरुपाचा पाऊस झाला. 
 
जळगावमध्ये तापी कोपली
जळगाव : जिल्हा तसेच मध्य प्रदेशात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने तापी नदीला पूर आला आहे. हतूनर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्णपणो उघडण्यात आले आहेत. दुसरीकडे रावेर तालुक्यातील पाच गावांना तापीने वेढा घातला आहे. ऐनपूर गावात पुराचे पाणी शिरले आहे. अमळनेरला पावसामुळे भिंत कोसळून महिला जागीच ठार झाली.
 

 

Web Title: Rainfall in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.