राज्यात पावसाचा जोर ओसरला

By admin | Published: September 21, 2015 01:09 AM2015-09-21T01:09:22+5:302015-09-21T01:09:22+5:30

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता सौराष्ट्र व लगतच्या भागाकडे सरकला आहे़ त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे़

Rainfall in the state rages | राज्यात पावसाचा जोर ओसरला

राज्यात पावसाचा जोर ओसरला

Next

पुणे : उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता सौराष्ट्र व लगतच्या भागाकडे सरकला आहे़ त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे़ पुढील दोन दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़
राजस्थान, पंजाब व हरियाणाच्या काही भागांमधून परतलेल्या नैऋत्य मोसमी पावसाची सीमा कायम आहे़ गेल्या २४ तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, मुंबई परिसरात रविवारी दिवसभर पाऊस पडत होता़ रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक ९० मिमी पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रातील सुरगणा येथे झाली़ येत्या २३ व २४ सप्टेंबरला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़
राज्याच्या विविध भागांतील पाऊस
माणगाव ७०, डहाणू, पालघर, शिरगाव, ताम्हिणी ६०, जव्हार, पेडणे, विक्रमगड, वाडा ५०, अंबरनाथ, मुरबाड, तळासरी, उल्हासनगर, विहार, दावडी, डुंगरवाडी, भिवंडी, कल्याण, कर्जत, मोखाडा, मुंबई ४०, कणकवली, मालवण, म्हापसा, फोंडा, केपे, रोहा, शहापूर, वेंगुर्ला, इगतपुरी, पेठ, भिरा ३०, चिपळूण, दोडामार्ग, कुडाळ, महाड, मंडणगड, मार्मागोवा, म्हसाळा, कोयना २०, श्रीवर्धन, सुधागड पाली, उरण, अक्कलकुवा, हरसुल, ओझरखेडा, लोणावळा, ठाकूरवाडी, वाणगाव, उम्बोणे, भिवपूरी प्रत्येकी १० मिमी पावसाची नोंद झाली आहे़

Web Title: Rainfall in the state rages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.