१ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणे, नवी मुंबईत कोसळधारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:43 AM2020-07-29T05:43:15+5:302020-07-29T05:43:23+5:30
सोमवारी मुंबईत १००.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ८ वाजता सरासरी ६० मिमी पावसाची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोमवारी मुंबईत १००.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ८ वाजता सरासरी ६० मिमी पावसाची नोंद झाली. १ आॅगस्टपासून कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथेही पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
काही ठिकाणी आकाश ढगाळ होते. पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई आणि ठाण्यात, तर पुढच्या ४८ तासांत मराठवाडा व लगतच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
पावसाची नोंद
(मिमीमध्ये)
कुलाबा -
५७.२
सांताक्रुझ -
२८.६
शहर-२७.४१
पूर्व उपनगर -३७.१८
पश्चिम उपनगर ३५.९८
च्दुपारी साडेबारा वाजल्यानंतर मुंबईत पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली. या काळात ७ ठिकाणी झाडे पडली. एका ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. दुपारी ४ नंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला.
च्आता पुढच्या २४ ते ४८ तासांत मुंबई, ठाण्यात, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडणार आहे.
च्सकाळी ८ ते १० या वेळेत शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी १० ते १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी १० नंतर त्याने थोडी विश्रांती घेतली. बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ होते. मात्र पाऊस बेपत्ता होता. त्यामुळे मंदावलेल्या वाहतुकीने पुन्हा वेग धरला.
रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार बरसणार
रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये येत्या ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडेल. तर, मुंबईत पुढील २४ तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाचा जोर कायम राहील.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग.