पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत, रेल्वेही रखडली
By admin | Published: July 11, 2014 11:08 AM2014-07-11T11:08:21+5:302014-07-11T14:23:10+5:30
ल्या दोन दिवसांपासून पडणा-या पावसाचा जोर शुक्रवारी सकाळीही कायम राहिल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून रेल्वेवरही पावसाचा परिणाम झाला आहे.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ११ - गेल्या दोन दिवसांपासून पडणा-या पावसाचा जोर आज सकाळीही कायम राहिला असून त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई व उपनगरांत पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाला आहे. मुंबईकरांची 'लाईफलाईन' मानल्या जाणा-या रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला असून मध्य व हार्बर रेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. दरम्यान येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाड हवामान खात्याने वर्तवला आहे.
पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, लालबाग, परळसह माहिम कॉजवे, माहिम चर्च अशा अनेक भागांत पाणी साचले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.