पावसाचा दगा; २ लाख हेक्टवरील सोयाबीनला फटका !

By Admin | Published: August 23, 2016 05:20 PM2016-08-23T17:20:42+5:302016-08-23T17:20:42+5:30

जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात तब्बल दुप्पटीने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे.

Rains of rain; Soyabean on 2 lakh hectare hit! | पावसाचा दगा; २ लाख हेक्टवरील सोयाबीनला फटका !

पावसाचा दगा; २ लाख हेक्टवरील सोयाबीनला फटका !

googlenewsNext

शेतकरी चिंतातूर : शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने वटारले डोळे

बाबूराव चव्हाण/ ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २३ : जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात तब्बल दुप्पटीने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १ लाख ७ हजार हेक्टर आहे. प्रत्यक्षात २ लाख ८ हजार ९६६ हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी पेरणी झाली. जुलैअखेरपर्यंत झालेल्या सततच्या रिमझीम स्वरूपाच्या पावसामुळे सर्वच पिके जोमदार आली. परंतु, हे पिके ऐन वाढीच्या तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल दोन लाख हेक्टवरील सोयाबीन अखेरच्या घटका मोजत आहे.

पाच वर्षांपासून सातत्याने जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्र वाढ होत आहे. खरीप हंगामाच्या एकूण सरासरी क्षेत्रापैकी चाळी ते बेचाळीस टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाने व्यापले आहे. यंदा जून महिन्यात वरूणराजाची चांगली कृपा झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनीही चाढ्यावर मुठ धरण्यास विलंब केला नाही. परिणामी पेरणीच्या टक्केवारीने शंभरी (१०६ टक्के) ओलांडली. जुलै महिन्यातील पावसाची सरासरी १५१ मिमी असताना प्रत्यक्ष २०३ मिमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे सर्वच पिकांची वाढ अपेक्षिापेक्षाही चांगली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. अनेक शेतकऱ्यांनी पिके पदरात पडणारच, असे गृहित धरून विमाही उतरविला नाही.

असे असतानाच आॅगस्ट महिन्यात पावसाने डोळे वटारले. आज-उद्या पाऊस पडेल, अशी अपेक्षा असतानाच वीस ते बावीस दिवसांचा कालावधी लोटला. परंतु, पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे विशेष: सोयाबीन पिकाला जबर फटका बसला आहे. शेंगा भरण्याच्या तसेच वाढीच्या अवस्थेत असलेली सुमारे २ लाख ८ हजार हेक्टरवरील ही पिके अक्षरश: अखेरच्या घटका मोजत आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिके करपून चालली आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या भयान संकटातून मोठ्या हिम्मतीने कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारा बळीराजा पुन्हा अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांनी थोड्याफार उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून तुषार सिंचन पद्धतीने पिके जगविण्यासाठीची कसरत सुरू केली आहे. परंतु, विद्युत भारनियमनामुळे हे प्रयत्नही अपुरे पडत आहेत.

काय आहे पिकांची अवस्था?
जिल्हाभरात ४७ हजार ८५० हेक्टवर उडीद आहे. हेही पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सुमारे २६ हजार हेक्टवर मुग आहे. शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. ९ हजार ८६० हेक्टवर बाजरीचे पीक आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पिकाखालील क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ९७ हजार ५०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्ष १ लाख ११ हजार ७३८ हेक्टवर पेरणी झाली आहे. पीक वाढीच्या अवस्थेत आहे. कापसाची लागवड १९ हजार ७५ हेक्टवर झाली आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पिकाखाली २२ हजार ९८ हेक्टवर क्षेत्र आहे. हे पीक सुद्धा वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, वीस ते बावीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. तर हलक्या जमिनीवरील पिके करपून चालली आहेत.
सरासरीच्या ५० टक्केही पाऊस नाही
जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ७६७.५ मिमी एवढे आहे. २२ आॅगस्टअखेर केवळ ३७४.१ मिमी म्हणजेच ४८.७ टक्के पाऊस झाला आहे. यापैकी जून महिन्यात १२७.४ मिमी, जुलै महिन्यात २०३.९ मिमी आणि आॅगस्ट महिन्यात (आजपर्यंत) ४२.८ मिमी म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या २० टक्के पाऊस पडला. जिल्ह्यात ४२ महसूल मंडळे आहेत. यापैकी १३ मंडळे अशी आहेत, की जेथे ३०० मिमी पेक्षाही कमी पाऊस झालेला आहे. विशेषत: या भागातील पिके सध्या करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिके वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने डोळे वटारले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.
----------------

Web Title: Rains of rain; Soyabean on 2 lakh hectare hit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.