राज्यात पावसाचा जोर वाढणार

By admin | Published: August 8, 2015 01:32 AM2015-08-08T01:32:49+5:302015-08-08T01:32:49+5:30

कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. येत्या चार दिवसांपर्यंत या भागात पावसाचा

Rains will increase in the state | राज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाचा जोर वाढणार

Next

पुणे : कोकण आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. येत्या चार दिवसांपर्यंत या भागात पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी तसेच विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलीमीटरमध्ये) : कोकण व गोवा : सांगे, वाल्पोई ४ , चिपळूण, खेड, लांजा, फोंडा ३, दापोली, कणकवली, महाड, माथेरान, रोहा २, गगनबावडा, महाबळेश्वर ४, विदर्भात पातुरमध्ये ३ व अकोट भामरागड येथे २ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Rains will increase in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.