तलावांमध्ये पावसाने खाते उघडले, 24 तासांत दीड हजार दशलक्ष लीटर जलसाठा
By admin | Published: June 25, 2016 07:41 PM2016-06-25T19:41:38+5:302016-06-25T19:49:52+5:30
शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस तलावांमध्येही बरसू लागला. त्यामुळे एका दिवसात तब्बल 657 दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आह़े
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 25 - महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने तलाव क्षेत्रांवरही शनिवारी कृपा दाखविली. शुक्रवार रात्रीपासून मुसळधार पाऊस तलावांमध्येही बरसू लागला. त्यामुळे एका दिवसात तब्बल 657 दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आह़े पाणीटंचाईच्या काळात ही वाढही समाधानकारक असल्याचे मत पालिका प्रशासनाने आज व्यक्त केले.
गेल्या वर्षी झालेला अपुरा पाऊस आणि यावर्षी मान्सून लांबल्यामुळे तलावांमध्ये खडखडाट झाला आहे. प्रमुख तलावांनी तळ गाठला असून राखीव जलसाठय़ातून पाणी उचलण्याची वेळ पालिकेवर आली आहे. त्यामुळे ऑगस्ट 2015 पासून सुरु असलेली 20 टक्के पाणीकपात कायम ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबई व ठाणे जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आह़े मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रतही खाते उघडले आहे. त्यामुळे कित्येक दिवसांनंतर तलावांमधील पाण्याची पातळी आज वाढली. मुंबईतील विहार आणि तुळशी तलावात दिवसभरात अनुक्रमे 188 मिमी व 140 मिमी पाऊस झाला आहे. प्रमुख तलावांमध्येही पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
तरीही पाणीकपात कायम
पावसाने आज तलावांमध्ये चांगली हजेरी लावली. मात्र असा पाऊस आणखी दहा ते 15 दिवस तलाव क्षेत्रात पडल्यास पाणीकपात रद्द करण्याबाबत विचार केला जाईल, तोर्पयत ही कपात कायम राहणार असल्याचे, उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.
जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये
तलावकमाल किमान आजची स्थितीआजचा पाऊस (मि़मी़)
मोडक सागर 163.15143.26145.8326.80
तानसा128.63118.87120.7055.20
विहार 80.1273.9275.04188.80
तुळशी139.17131.07134.44140.00
अप्पर वैतरणा 603.51595.445946110.40
भातसा142.07104.90106.9321.00
मध्य वैतरणा 285.00220.00245.2022.50
एकूण
2016 - 94304 दशलक्ष लीटर
2015- 314723 दशलक्ष लीटर
* मुंबईत दररोज 3750 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़
* गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मुंबईत 20 टक्के पाणीकपात आह़े
* त्यामुळे आजच्या घडीला 3250 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आह़े
* 1 ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये 14 लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे आवश्यक आह़े