गुड न्यूज! सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील; बॅड न्यूज! राज्याचं तापमान 2 अंशांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 08:57 AM2022-03-23T08:57:50+5:302022-03-23T08:58:12+5:30

तीस वर्षांच्या अभ्यासावरून पुढच्या तीस वर्षांचे अनुमान; हवामान बदल, तापमानवाढीचा फटका

Rainy days will increase in all districts State temperature will rise by 2 degrees | गुड न्यूज! सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील; बॅड न्यूज! राज्याचं तापमान 2 अंशांनी वाढणार

गुड न्यूज! सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील; बॅड न्यूज! राज्याचं तापमान 2 अंशांनी वाढणार

Next

- सचिन लुंगसे/निशांत वानखेडे

मुंबई/नागपूर : हवामान बदल, जागतिक तापमानवाढीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? १९९० पासूनच्या अभ्यासावरून सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी या संशोधन संस्थेने अनुमान काढले आहे. यात राज्यातील तापमान पुढच्या तीस वर्षांत १ ते २ डिग्रीने वाढले. तर प्रदूषण असेच राहिले तर सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) साठी भारतीय हवामान खात्याच्या मदतीने या संस्थेने पश्चिम भारतातील राजस्थान, गुजरात, गोवा, महाराष्ट्राचा अभ्यास केला असून पावसाचे दिवस वाढल्याचा फायदा दुष्काळी जिल्ह्यांना होईल. अधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मात्र अतिवृष्टीचे संकट येईल.

प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला २.५ , अमरावती २.९, औरंगाबाद २.९, भंडारा २.६ , बुलडाणा २.३, धुळे २.२, गोंदिया २.१, हिंगोली २.२, जळगाव २.५, जालना २.७, नागपूर २.२, नंदुरबार २.५, नाशिक २.४, वर्धा २.१, वाशिम २.३ डिग्रीने वाढेल.

साधारण परिस्थितीत १ अंशापेक्षा अधिक तापमानवाढीचे जिल्हे
भंडारा २.० । अकोला १.३ । अमरावती १.६ । औरंगाबाद १.१ । बीड १.२। बुलडाणा १.४ । धुळे १.१ । गोंदिया १.१ । हिंगोली १.२ । जळगाव १.३ । लातूर १.४ । नागपूर १.१ । नंदुरबार १.६ । उस्मानाबाद १.४ । वर्धा १.१ । वाशिम १.२ । यवतमाळ १.१

प्रदूषणामुळे तापमानवाढीचा गंभीर धोका
प्रदूषणाला आळा घातला तर महाराष्ट्रात पुढील तीस वर्षांत साधारणपणे १ ते २ डिग्री अंश सेल्सिअस इतके तापमान वाढेल. परंतु, तो आळा घालण्यात अपयश आले तर मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षा दुपटीने वाढ होईल. बहुतेक जिल्ह्यांमधील तापमान दोन ते तीन डिग्रीने वाढलेले असेल. या वाढीचे गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामांवर होणार आहे. आज वाढलेले जागतिक तापमान कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा पुढे १० वर्षे कमी होणार नाही. परंतु वृक्षारोपण करणे, जंगलाचे प्रमाण वाढविणे, लहान बंधारे, तळे इत्यादी जलसाठे वाढविणे, निसर्गपूरक जीवनशैली अंगीकारणे अशा अनेक प्रयत्नांनंतरच हवामान बदल रोखला जाऊ शकतो. त्यासाठी शासनाने राज्य पातळीवर हवामान बदल किती झाला त्याचा अभ्यास करावा, कृती आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करावी, असा उपाय सुचविण्यात आला आहे.

पावसाचे दिवस वाढले तर दुष्काळी जिल्ह्यांना फायदा
कार्बन उत्सर्जन व प्रदूषण असेच राहिले तर महाराष्ट्रातील राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे २ ते ८ दिवस वाढतील.
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ८, मुंबई उपनगरात ७, अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली, जालना व सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ६, अकाेला, बुलडाणा, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, सांगली व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी ५ दिवस तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमधध्ये २ ते ४ दिवस अशी ही वाढ राहील.
प्रदूषणाला आळा घातला गेला तर मात्र यवतमाळ वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे २ ते ९ दिवस वाढतील.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाची सरासरी गाेंदियात किमान १ टक्का तर पुण्यात कमाल २९ टक्क्यांनी वाढेल. प्रदूषण वाढले तर मात्र गाेंदियाची सरासरी ३ तर पुण्याची ३४ टक्क्यांनी वाढेल.

Web Title: Rainy days will increase in all districts State temperature will rise by 2 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.