शहरातील पावसाळापूर्व कामांचा उडाला बोजवारा

By Admin | Published: June 6, 2017 12:14 AM2017-06-06T00:14:46+5:302017-06-06T00:20:02+5:30

नांदेड:मनपाने केलेल्या पावसाळापूर्व कामांचा बोजवारा उडाला आहे़

The rainy season in the city will be destroyed | शहरातील पावसाळापूर्व कामांचा उडाला बोजवारा

शहरातील पावसाळापूर्व कामांचा उडाला बोजवारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:मनपाने केलेल्या पावसाळापूर्व कामांचा बोजवारा उडाला आहे़ पावसाळा तोंडावर असताना शहरातील लहान, मोठ्या ३२२ नाल्यांची साफसफाई अर्धवट आहे़
जेसीबी व पोकलेनच्या सहायाने मोठ्या नाल्यातील गाळ, कचरा काढण्यात आला़ तर लहान नाल्यांची वॉर्डनिहाय स्वच्छता करण्यात आल्याचे मनपाकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक भागातील नाल्यांचे पाणी तुंबून ते रस्त्यावर येत आहे़ सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या नाल्यांची साफसफाई करून भुयारी मार्गातील पाणी काढण्यासह अन्य देखभालीची जबाबदारी असताना महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे़ हिंगोली गेट भुयारी मार्गावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाय योजना आखण्यात आली नाही़ पावसाळ्यात महावीर चौक भागात नाल्यांतील पाणी रस्त्यावर वाहते़ तर गुरूद्वारा चौरस्ता, राजकार्नर ते वर्कशॉप रस्त्यावर नाली सफाईचे काम अपूर्ण आहेत़

Web Title: The rainy season in the city will be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.