पावसाळी साथींनी फास आवळला
By admin | Published: July 13, 2014 12:35 AM2014-07-13T00:35:30+5:302014-07-13T00:35:30+5:30
जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावली.
Next
मुंबई : जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात तापाचे 1 हजार 278, गॅस्ट्रोचे 354 आणि मलेरियाचे 1क्3 रुग्ण आढळून आले आहेत. एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आलेला पाऊस एन्जॉय करणा:या मुंबईकरांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणो आहे.
पावसाळी आजारांमुळे मुंबईकर जूनमध्येही आजारी पडले होते. जून 2क्13 मध्ये तापाचे 3 हजार 713 रुग्ण आढळून आले होते. मात्र यंदाच्या वर्षी जून महिन्यात जास्त पाऊस पडला नसतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत 929 जास्त रुग्ण म्हणजे एकूण 4 हजार 642 रुग्ण आढळून आले. जुलैच्या (2क्14) पहिल्या आठवडय़ामध्ये 1 हजार 278 तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. जून 2क्13 मध्ये मलेरियाचे 858 रुग्ण आढळले होते, तर जून 2क्14 मध्ये 566 रुग्ण आढळून आले आहेत. जुलै 2क्13 मध्ये मलेरियाचे 1 हजार 262 रुग्ण आढळले होते, तर या वर्षी जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात 1क्3 रुग्ण मलेरियाचे आढळून आलेले आहेत.
1 ते 7 जुलै 2क्14 या कालावधीमध्ये गॅस्ट्रोचे 354 रुग्ण आढळून आले आहेत. तर जुलै 2क्13 मध्ये गॅस्ट्रोचे 2 हजार 6क्4 रुग्ण आढळून आले होते. जून 2क्14 मध्ये 91क् गॅस्ट्रोचे मुंबईत रुग्ण आढळून आले होते. यंदा जुलैच्या सुरुवातीलाच 7 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. जुलै 2क्13 मध्ये डेंग्यूचे 66 रुग्ण आढळून आले होते. मात्र पावसाळी आजारामुळे कोणाचाही बळी गेलेला नाही. ही आकडेवारी महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली आहे.
यंदाच्या पावसाळ्य़ात अजूनही लेप्टो, टायफॉइड, चिकनगुनिया, कॉलरा, हीपॅटायटीससारखे आजार बळावता दिसलेले नाहीत. कॉलरा, चिकनगुनियाचा एकही रुग्ण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आढळलेला नाही. जून 2क्14 मध्ये कॉलराचा 1 आणि चिकनगुनियाचे 5 रुग्ण आढळून आले होते. जुलैच्या पहिल्या आठवडय़ामध्ये हीपॅटायटीसचे 32, टायफॉइडचे 2क् आणि लेप्टोचे 2 रुग्ण आढळून आले आहेत.
पावसाला सुरुवात झाल्यावर अस्वच्छता आणि साचलेल्या पाण्यांमध्ये डासांची पैदास होते. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार होतात, तर दूषित पाणी अथवा दूषित अन्न खाल्यामुळे गॅस्ट्रोसारखे आजार उद्भवतात. यामुळे घर आणि परिसर स्वच्छ ठेवणो, काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुणो, उघडय़ावरचे अन्ना पदार्थ खायचे टाळा, स्वच्छ पाणी प्या, पावसात जास्त भिजू नका, असा सल्ला डॉक्टर मुंबईकरांना देत आहेत. (प्रतिनिधी)
आजारजून 13जून 14जुलै 13जुलै 1 ला आठवडा
ताप3713464262641278
गॅस्ट्रो129791क्26क्4354
मलेरिया85856612621क्3
टायफॉइड798क्1522क्
हेपॅटायटीस739615232
डेंग्यू3227667
लेप्टो212242
कॉलरा 12144क्
चिकनगुनिया 856क्
स्वाइन फ्लू212क्
पावसाला सुरुवात झाल्यावर साचलेल्या पाण्यांमध्ये डासांची पैदास होते. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार होतात, तर दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसारखे आजार उद्भवतात.