रिमझिम बरसणारी पावसाळी गाणी नक्की ऐकाचं.....
By admin | Published: July 3, 2016 05:34 PM2016-07-03T17:34:29+5:302016-07-03T17:34:29+5:30
बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये पावसातील गाणी असून काही गाणी अर्थपूर्ण शब्दांनी भरलेली आहेत तर काही गाणी हॉट आहेत. अशीच काही लोकप्रिय गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ : निसर्गातली नवजीवन फुलवणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे पाऊस. रखरखलेल्या धरेला शांतवणारा, तिच्या शुष्क भेगाळल्या ओठांवर थेंबांचा शिडकावा करत तिला सृजनाची शक्ती परत मिळवून देणारा, हसरी बाळे परत तिच्या मांडीवर खेळवणारा. हाच पाऊस मना मनाला तृप्त करतो, हाच पाऊस प्रेमीजनांच्या हृदयात एक वेगळीच ऊब निर्माण करतो, विरहाचा अग्नी चेतवतो. हाच पाऊस बच्चेकंपनीला कारंज्यांसारखे उत्साहाने बेभान व्हायला लावतो तर सरत्या पिढीला "अजून एक पावसाळा" असं म्हणत अनुभवांचा लेखा जोखा घ्यायला लावतो. हा पाऊस जेव्हा जेव्हा सिनेमात हजेरी लावतो तेव्हा नेहमीच एक विशिष्ट भूमिका साकारत असतो.
ऑस्कर पारितोषिकासाठी प्रवेशिका मिळवून सर्वोत्तम विदेशी सिनेमाचं नामांकन मिळवलेला आशुतोष गोवारीकरांचा "लगान" तर पावसाच्या येण्या न येण्यावर आपला कथेचा डोलारा सांभाळून होता. ब्रिटिशांनी दुष्काळाने हैराण झालेल्या खेडुतांवर दुप्पट शेतसारा लादणे ही पार्श्वभूमी होतीच पण त्यांच्याबरोबरच दुसरा खरा खलनायक हा पाऊस होता. "घनन घनन घनन घनन घनन घनन गिरी गिरी आये बदरा" असं वाजत गाजत त्याचं स्वागत केलं जातं. कित्येक वर्षांपुर्वी त्याचं स्वागत आपण "मदर इंडिया" मध्ये "दुख भरे दिन बिते रे भैया अब सावन आयो रे... देख रे घटा घिरकर आयी रस भर भर लायी" म्हणत केलं होतं. तर "दो बिघा जमीन" मध्ये "धरती कहे पुकारके, बीज बिछाले प्यारके, मौसम बीता जाए"
बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये पावसातील गाणी असून काही गाणी अर्थपूर्ण शब्दांनी भरलेली आहेत तर काही गाणी हॉट आहेत. अशीच काही लोकप्रिय गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
‘टिप टिप बरसा पानी’ हे मोहरा या सिनेमातील गाणं आजही लोकप्रिय आहे. रविना टंडन आणि अक्षय कुमार यांचे हे हॉट गाणं आहे. रविना टंडन या गाण्याने सुपरस्टार झाली होती. या गाण्यात भर पावसात रविनाने आग लावली होती.
"घोडे जैसी चाल हाथी जैसी दुम, ताक झुम झुम ताक झुम झुम" या गाण्यावर "दिल तो पागल है" या नृत्यसंगीतमय सिनेमात माधुरी दिक्षित, शाहरुख खान आणि बच्चे कंपनीला मस्त भिजवून काढलं होतं.
‘कांटे नही कटती ये दिन ये रात’ हे ‘मिस्टर इंडिया’या सिनेमातील अनिल कपूर आणि श्रीदेवीवर चित्रीत केलेलं गाणं आजही हॉट गाण्यांच्या यादीत लिहिलं जातं. या गाण्यात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जबरदस्त हॉट केमिस्ट्री बघायला मिळाली असून श्रीदेवीने यात कमाल केली आहे. पावसाच्या गाण्यांमध्ये हे गाणं टॉपवर असायला काहीच हरकत नाही.
राज कपूर आणि नर्गिस ह्या जबरदस्त केमिस्ट्री असलेल्या जोडीचं 'श्री ४२० "' मधलं "प्यार हुवा इकरार हुवा है प्यारसे फिर क्यूं डरता है दिल". एकच छत्री, एकाच वेळी दोघांना सारखाच भिजवणारा पाऊस, इतकं जवळ असूनही कुठेही अधाशी प्रेमाचा मागमूसही नाही. ह्या गाण्यांना शारीर प्रेम दाखवायची गरजच भासली नाही
‘सरफरोश’ या सिनेमातील ‘जो हाल दिल का’ हे गाणंही आज लोकं आवडीने ऎकतात. ऑल टाईम हिट गाण्यांमध्ये या गाण्याचा उल्लेख करावा लागेल. आमिर खान आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून दोघांचीही मस्त केमिस्ट्री यात आहे. सोबतच पाऊसही आहेच.
'आराधना' मधलं चिंब भिजलेल्या राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचे "रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना.. भूल कोई हमसे ना हो जाए" हे खूप काळ लक्षात राहिलेले गाणे घडले. बाहेर हवेतला पावसाळी गारवा आणि आतला नैसर्गिक मानवी भावनांचा धगधगलेला विस्तव दिग्दर्शकाने अचूक चित्रित केला आहे.
अफसाना प्यार का’ या सिनेमातील आमिर खान आणि निलम यांच्या चित्रीत हे गाणंही पावसातील लोकप्रिय गाण्यांमध्ये आहेच. या गाण्यात आमिर खाने याने अफलातून डान्स केलाय. तर या गाण्याची बोलही छान आहेत.
जितेंद्र आणि लीना चंदावरकर यांनी "हमजोली" मधल्या "हाय रे हाय.. नींद नही आय" गाण्यावर पावसात बसून, झोपून, उड्या मारून धमाल नाच केला. तो नाचाचा अनोखा प्रकार प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला होता. आजही भेंड्या खेळताना 'ह' अक्षर आलं की हे गाणं म्हटलं जातंच आणि जितेंद्र, लीना आठवतातच.
रिम झिम गीरे सावन’ हे अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्या चित्रीय गाणं पावसाची चाहूल लागताच ओठांवर येतं. मुंबईतील मरीन ड्राईव्हचं सुंदर रूप या गाण्यात बघायला मिळतं. सोबतच पावसाचा आनंद घेता येतो
जैसी करनी वैसी भरनी: या सिनेमातील ‘मेहके हुऎ तेरे’ हे गोविंदा आणि किमी काटकर यांच्यावर चित्रीत गाणं आहे. या गाण्यात दोघांचाही धमाकेदार डान्स बघायला मिळतो.
चांदनी: या लोकप्रिय सिनेमातील ‘लगी आज सावन की’ या गाण्याशिवाय ही यादीच पूर्ण होऊ शकत नाही. श्रीदेवी आणि विनोद खन्ना यांच्यावर हे सुपरहिट गाणं चित्रीत झालं असून आजही हे गाणं हिट आहे.