मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू

By admin | Published: January 6, 2015 02:13 AM2015-01-06T02:13:16+5:302015-01-06T02:13:16+5:30

शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणामुळे मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून आरक्षण देणे गरजेचे आहे,

Raise Advocates' army for the Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू

मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू

Next

पुणे : शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणामुळे मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून आरक्षण देणे गरजेचे आहे, हे सरकार उच्च न्यायालयास पटवून देईल, त्यासाठी उत्तमोत्तम वकिलांची फौज उभी करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात संमत केल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेतेर्फे शिंदेशाही पगडी, तलवार आणि शिवप्रतिमा देऊन फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे होते.
मागील सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत खोटारडेपणा केला. मात्र १९ फेब्रुवारीला, शिवजयंतीच्या दिवशी जगातील या भव्य स्मारकाचे भूमीपूजन केले जाणार असून, या स्मारकाचे काम कमीत कमी वेळेत व्हावे यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. मराठा समाजाची स्थिती अतिशय दयनीय असून फक्त शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची आमची मागणी आहे. राजकीय आरक्षण आम्हाला कधीच नको, असे मेटे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

ब्राह्मणांना रक्षण हवे
काम करणे हीच आमची जात आहे. सर्वांना आरक्षण देता येणार नाही. मात्र एखाद्या समाजातील तळाच्या माणसाला ते दिले जावे, असा विचार झाला पाहिजे. ब्राह्मणांना रक्षण द्यावे, आरक्षण नको. ब्राह्मणांनी नोकऱ्या न करता उद्योगधंदा करावा, असे माझे आवाहन आहे, असे गिरीश बापट म्हणाले.
शिवस्मारक समिती अध्यक्षपदी मेटे
राष्ट्रवादीतील सन्मान सोडून केवळ मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी मेटे भाजपाच्या साथीला आले, असे सांगून फडणवीस यांनी मेटे यांची शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली.

Web Title: Raise Advocates' army for the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.