Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू; राज ठाकरे पुण्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 07:42 PM2021-07-10T19:42:11+5:302021-07-10T19:42:34+5:30

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (MNS) तयारीला लागली आहे.

raj thackeray arrives in pune for municipal corporation election preparation | Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू; राज ठाकरे पुण्यात दाखल

Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू; राज ठाकरे पुण्यात दाखल

Next

पुणे: आगामी काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड दौरे वाढले आहे. या दौऱ्यांमध्ये महापालिका निवडणुकांच्या रणनीती ठरविण्याचे प्रयत्न देखील सुरु आहे. भाजप, शिवसेनेसह अन्य पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच आता पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (MNS) तयारीला लागली आहे. याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात दाखल झाले आहेत. (raj thackeray arrives in pune for municipal corporation election preparation)

कोरोना संकटाच्या कालावधीत अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले. तसेच राज ठाकरेंनी केलेल्या एका फोनवर अनेकांची कामे झाल्याचेही जनतेने पाहिले. यामुळे जनतेच्या मनातील विश्वास कायम राखण्यासाठी तसेच पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी मनसेने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. 

“आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’, अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार”

शहर कार्यालयाचे उद्धाटन 

राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. आज आणि उद्या असे दोन दिवस ते पुण्यात असणार आहेत. मनसेच्या शहर कार्यालयाचे उद्धाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचसोबत मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. तसेच यानंतर पुढील आठवड्यात राज ठाकरे तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. १६ ते १८ जुलै या कालावधीत ते नाशिक येथे असतील. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे हे दौरे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. 

“तसं काही नव्या सहकार मंत्रालयाकडून होऊ नये”; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने व्यक्त केली भीती

दरम्यान,  शिवसेना संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आकुर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक २०२२ ला होणार आहे. महापालिकांच्या निवडणुकीतील आघाडीबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ५५ नगरसेवक करण्याचे टार्गेट आहे. ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर होणार का? या प्रश्नावर, ५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, मग ५५ जागांवर पिंपरीत शिवसेनेचा महापौर का नाही, असे राऊत म्हणाले. 
 

Web Title: raj thackeray arrives in pune for municipal corporation election preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.