Raj Thackeray: पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिले ३ मंत्र; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 10:59 AM2022-04-30T10:59:07+5:302022-04-30T10:59:27+5:30
माझे आजोबा हे कडवट हिंदुत्ववादी होते. एका पुस्तकावरून आजोबांचं चित्र उभं करू नका. कर्मकांडांच्या विरोधात आजोबा होते. देव-धर्माच्या विरोधात नाही
मुंबई – राज ठाकरेंची बहिण जया ही आमची मैत्रिण होती. मात्र राज ठाकरे तिचा भाऊ आहे मला माहित नव्हतं. राज ठाकरेंनी सुरुवातीला मला पाहिलं होतं. त्यांनीच प्रपोज केला होता असा किस्सा शर्मिला ठाकरे यांनी सांगितला. राज आणि माझ्या वयात २ वर्षाचं अंतर आहे. मी राज ठाकरेंपेक्षा २ वर्षाने मोठी आहे. परंतु बाळासाहेब आणि माझे वडील एकमेकांचे चांगले मित्र होते. आमच्या नात्याला कुठलाही विरोध झाला नाही असंही शर्मिला ठाकरेंनी सांगितले.
एबीपी माझावरील महाकट्टा कार्यक्रमात राज ठाकरे(Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे यांची मुलाखत होती. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, माझा पहिला मोर्चा होता, त्यावेळी मी भाषण करत नव्हतो. मोर्चाला माँ आल्याचं सांगितले. माँ गाडीत येऊन माझं भाषण ऐकायला बसली होती. गाडीजवळ मी गेलो, ती म्हणाली काकांना भेटायला जायचं आहे. दुपारी २-३ वाजता बाळासाहेबांना भेटायला गेलो. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल. आपण किती हुशार आहोत हे भाषणातून सांगू नको. लोकं किती हुशार आहेत ते बोल. मी भाषणात काय बोललो त्याऐवजी भाषणातून काय दिलं याचा विचार कर असं काकांनी मला सांगितले.
तसेच माझे आजोबा हे कडवट हिंदुत्ववादी होते. एका पुस्तकावरून आजोबांचं चित्र उभं करू नका. कर्मकांडांच्या विरोधात आजोबा होते. देव-धर्माच्या विरोधात नाही. जे मला सल्ले देत आहेत त्यांनी प्रबोधनकार ठाकरे नीट वाचावे. ज्याचं धर्मावर प्रेम आहे तोच माणूस त्या धर्मातील चुकीच्या गोष्टी सांगू शकतो. माझे आजोबा ब्राह्मणदोषी असल्याचं सांगितले. माझे विचार हे आजोबांच्या विचारसरणीशी जुळते आहेत. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर आजोबा मला लिमलेटची गोळी द्यायची. मी ४ वर्षाचा होतो असंही राज ठाकरेंनी सांगितले.
नीट राहायला सांग, नाहीतर...
सुरुवातीच्या काळात मोबाईल नव्हते, राज ठाकरे दौऱ्यावर जायचे तेव्हा आम्हाला चिंता वाटायची. आजही खूप चिंता वाटते. आम्ही कदम मेन्शनमध्ये राहायला असताना राज ठाकरेंना धमकी देणारा फोन दुबईवरून आला होता. नीट राहायला सांग असं सांगितले. त्याकाळी शिवसेनेत राज ठाकरे खूप सक्रिय होते. विद्यार्थी सेनेची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. राज ठाकरेंना पहिल्यांदा सुरक्षा आली, पोलिसांची गाडी बघूनही आश्चर्य वाटलं. याची सवय नव्हती असंही शर्मिला ठाकरेंनी सांगितले.
सभेच्या दिवशी हाता-पायाला घाम फुटतो
ज्या दिवशी सभा असते तेव्हा कुणालाही राज ठाकरेंच्या खोलीत प्रवेश नसतो. सभेत कधीही भाषण वाचून म्हणत नाही. राज ठाकरे चिंतन करत असतात. सभेच्या दिवशी हातापायाला घाम फुटलेला असतो. मला १०० गोष्टी माहिती असल्या तरी व्यासपीठावर मी काय बोलणार आहे हे मी ठरवत नाही. अनेक मुद्दे काढलेले असतात. परंतु माईकसमोर उभं राहेपर्यंत हाताला घाम येतो. सभेत बोलताना समोर काही दिसत नाही. जे काही असते ते मांडत असतो. एक विषय नसतो. एखादा मुद्दा मांडला तर त्याचे अनेक पैलू असतात. ते सगळे मांडत बसत नाही. काही ठरलेले नसते. मी बोलता बोलता विषय मांडत असतो. काही विषय राहिला तर शिदोरे चिठ्ठी पाठवून कळवतात असं राज ठाकरेंनी सांगितले.