राज ठाकरेंना आझाद मैदान मोर्चाप्रकरणी दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 09:01 PM2017-07-18T21:01:03+5:302017-07-18T21:01:03+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला

Raj Thackeray console Azad Maidan rally | राज ठाकरेंना आझाद मैदान मोर्चाप्रकरणी दिलासा

राज ठाकरेंना आझाद मैदान मोर्चाप्रकरणी दिलासा

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.  2012 मध्ये  गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत राज ठाकरे यांनी मोर्चा काढला होता. याप्रकरणी दाखल झालेला खटला रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे. 
 
ऑगस्ट 2012 मध्ये मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चाला आझाद मैदानाजवळ हिंसक वळण लागले होते.  रझा अकादमीनं  काढलेल्या या मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. या मोर्चामध्ये दोन जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी झाले होते. या जमावानं पोलिसांनाही मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी मोर्चा काढला होता. राज ठाकरेंनी परवानगी नसतानाही मोर्चा काढल्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. 
 
रझा अकादमीच्या मोर्चानंतर उसळलेल्या दंगलीत पोलिसांना तसेच पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढण्य़ात आला होता. यावेळी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारणा-या तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि पोलीस आयुक्त अरूण पटनायक यांच्यावर टीकेच्या फैरी झाडल्या होत्या.
 
 
 

 

Web Title: Raj Thackeray console Azad Maidan rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.