राज ठाकरे नकलाकार : नाशिकचा चेहरा भाजपाने बदलला : देवेंद्र फडणवीस

By admin | Published: February 18, 2017 07:40 PM2017-02-18T19:40:44+5:302017-02-18T19:51:21+5:30

राज ठाकरे दावा करतात की नाशिकचे ‘नवनिर्माण’ आम्ही केले; पण ते हे विसरतात की त्यांची महापालिका सक्षम नाही

Raj Thackeray Digitize: BJP changes face of Nashik: Devendra Fadnavis | राज ठाकरे नकलाकार : नाशिकचा चेहरा भाजपाने बदलला : देवेंद्र फडणवीस

राज ठाकरे नकलाकार : नाशिकचा चेहरा भाजपाने बदलला : देवेंद्र फडणवीस

Next



नाशिक : राज ठाकरे दावा करतात की नाशिकचे ‘नवनिर्माण’ आम्ही केले; पण ते हे विसरतात की त्यांची महापालिका सक्षम नाही त्यामुळे महापालिकेचा खर्चाची रक्कमही राज्य-केंद्र सरकारने द्यावी, कुंभमेळा यशस्वी करायचा आहे, असे त्यांनीच मला सांगितले होते. सरकारने २२००कोटी रुपयांचा कुंभमेळा विकास निधी दिला आणि कुंभमेळा आदर्शपध्दतीने पार पडला. नाशिकचा चेहरा भाजपाने बदलला आणि मी वचन देतो नाशिकला मी दत्तक घेतो आणि नाशिकला गतवैभव पाप्त करुन दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना देत ठाकरे बंधूंवर हल्ला चढविला.
महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी सभेला गर्दीच नसल्याने शहरात पावणेपाच वाजेपासून दाखल झालेले फडणवीस यांना तब्बल तासभर प्रतिक्षा करावी लागली. पावणेसात वाजता फडणवीस यांनी माईक हातात घेतला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज ठाकरे हे नकलाकार आहे, त्यांच्याकडे यापुढे नकलाच करण्याचे काम राहणार आहे. त्यांच्याक डे कल्पकबुध्दी आहे, हे चांगले आहे; मात्र दुर्देवाने ते त्या बुध्दीचा चांगला वापर करत नाही, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला. राज ठाकरे म्हणतात ‘बॉटनिकल गार्डन’ आम्ही केले; मात्र ते हे विसरतात की वनविभागाने तेथे खुप आगोदरपासून वनसंपदा जपून ठेवली होती तेथे ‘दिवाबत्ती’ रस्त्यांची सोय केली म्हणून ते गार्डन तुमचे झाले असे मुळीच नाही.
नाशिकचे तात्यासाहेब ज्यांचा संपुर्ण महाराष्ट्राला हेवा वाटतो त्यांच्या नावाने असलेल्या कुसुमाग्रज उद्यानाच्या विकासासाठी सत्तेत नसताना ‘मनसे’ रस्त्यावर उतरली, चांगले केले मात्र सत्तेत आल्यानंतर कुसुमाग्रज उद्यानाचा त्यांना विसर पडला हे दुर्देवच आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने आंदोलने करुन प्रसिध्दी मिळविली आणि भोळ्याभाबड्या नाशिककरांना थापा देऊन सत्ता मिळविली; मात्र आता सुज्ञ नाशिककर मनसेला नाशिकबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपिठावर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे आदि उपस्थित होते.
--
फडणवीस यांच्या भाषणातील मुददे :

* शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर क र्जमुक्त करणे हा भाजपाचा उद्देश आहे.
* शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि ती आम्ही देणार.
* नाशिकला फूड पार्क साकारून फळोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आधार’ देऊ.
* शिवसेना-मनसेने खालच्या पातळीवर जाऊन ‘डीसी’ची यादी तयार करुन व्हायरल केली.
* भाजपा राज्य व केंद्रात विकासाच्या नावावर सत्तेत आली आहे.
* लबाडांच्या भुलथापांना बळी पडू नका.
* लवकर महिंद्र कंपनी नाशकात १५०० कोटींची गुंतवणूक करुन नव्या रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार आहे.
* विकासाकरिता नाशिक भाजपाला हवे आहे.
* नाशिकमध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यास नाशिकचे गतवैभव पुन्हा प्राप्त करु न दिल्याशिवाय राहणार नाही.
* नाशिकला कोणी वाली नाही, असे म्हणणारे खुप आहे, पण मी नाशिकला आज दत्तक घेतले असून यापुढे नाशिक माझे आहे.
*भाजपाची सत्ता आल्यास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील सर्व झोपडपट्टयांमधील गरीबांच्या घरांचा प्रस्ताव तयार करुन द्या, जेवढ्या घरांचा प्रस्ताव येईल, तेवढे घरे दिल्याशिवाय राहणार नाही. कारण ही ‘इंदिरा आवास योजना नाही’.
*नाशिकच्या विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयासोबत माझा संवाद सुरू आहे.

 

Web Title: Raj Thackeray Digitize: BJP changes face of Nashik: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.