राज ठाकरेंनी ५ वर्षे केवळ नक्कलच केली - मुख्यमंत्र्यांची टीका
By admin | Published: February 18, 2017 07:25 PM2017-02-18T19:25:07+5:302017-02-18T19:46:24+5:30
ज ठाकरे यांनी पाच वर्षे नाशिकमध्ये केवळ नक्कलच केली, विकासकामे नाहीत' असा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १८ - ' उद्धव आणि आदित्या ठाकरे यांची फक्त लेना बँक आहे, देना बँक नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. नाशिकमदील सभेत बोलताना त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंवरही तोफ डागली. ' राज ठाकरे यांनी पाच वर्षे नाशिकमध्ये केवळ नक्कलच केली, विकासकामे नाहीत. कृष्णकुंज बँकेची शाखा कुठेही नाही' असेही मुख्यमंत्री म्हणाले.
'हे सरकार शेतकऱ्यांना कर्ज माफी देईल आणि त्यांना कर्ज मुक्त देखील करेल. पण उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी मला सांगावे आपण कधी ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांशी कधी संवाद साधलाय का?' असा सवालही त्यांनी विचारला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे :
- मतदान करणं हे गुंतवणूक करण्यासारखं असतं, चुकीची गुंतवणूक करा तरच व्याज चांगलं भेटत
- मतांची बँक योग्य ठिकाणी करा
- पहिल्यांदा आम्ही गिरीश महाजन यांना "कुंभ मेळा मंत्री" पद दिलं
- नाशिकचा चेहरा जो बदलला तो कुंभ मेळ्याच्या पैशांनी बदलला
- कुंभमेळ्याचं सर्व नियोजन आम्ही केलं
- पैसा सरकारने दिला,महापालिकेकडे पैसा नव्हता
- 2219 कोटी निधी दिला
- या पैशातून नाशिकचा विकास झाला
- उध्वव व राज ठाकरेंवर टीका
- नकलाकारानो तुमच्याकडे नकला करण्याचं काम राहील - राज ठाकरेंवर टोला
- आधी भुजबळांच्या नकला केल्या, आता आमच्या नकला करताहेत
- उद्धव म्हणतात कर्जमाफी झाली पाहिजे
- हि आमचीही भूमिका
- शेतकऱ्याला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करू
- त्यानंतर कर्जमाफी करू
- नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नियोजनाचा अभ्यास करून उज्जैनचा कुंभमेळ्याचं नियोजन
- नाशिककरांना विस्थापित करण्याचा प्रश्नच येत नाही
- हा विरोधकांचा बोगस प्रचार
- लबाडांच्या भूलथापांना बळी पडू नका
- Dcr नियमांची यादी सेना, मनसेच्या लोकांनी तयार केली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली
- राज ठाकरे कल्पक आहेत, पण त्यांची कल्पना योग्य ठिकाणी वापरत नाही
- रतन टाटा ना बोलावून काय केलं ?
- तर बोटॅनिकल गार्डन केलं
- राज ठाकरे कल्पक आहे
- पण कल्पकता भलत्याच ठिकाणी वापरतात
- अति विराट, प्रचंड सभा आहे
- 2019 पर्यंत प्रत्येक गरजूला घर
- गरजूला जात-पात-धर्म नसतो
- मागेल त्या प्रत्येक गरीबाला घर देणार
- राज्य सरकारच्या माध्यमातून 1200 आजारांकरिता मोफत उपचार
- स्टेन्ट ची किंमत 85 टक्क्यांनी मोदींनी कमी केली
- - महिंद्रा 1500 कोटींची गुंतवणूक करतंय
- रोजगार उत्पन्न होणार
- रामदेवबाबांचा फूड पार्क नाशिकला
- फळबागा करणाऱ्यांना मोठा फायदा
- विमानतळावर वाहतूक लवकरच सुरू होणार
- सुशिक्षीत बेरोजगारांना कौशल्य कर्ज
- 1 लाख 20 हजार कोटी छोटया व्यावसायिकांना 10 लाखापर्यंतच कर्ज विना गॅरंटी/विना तारण
- देशातील बँकांत मोठा पैसा
- यातील 40 टक्के पैसा कर नाही भरला तर जप्त होणार
- या पैशातून महिलांना मदत आणी रोजगार नियोजन
- माझं दत्तक गाव आजपासून नाशिक
- नागपूर सांभाळण्यासाठी गडकरी सक्षम