मोदी-शहांकडे 'लक्ष्मी' मागतीये देश चालवायला पैसे; व्यंगचित्रातून राज ठाकरेंची कडाडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 04:55 PM2017-10-19T16:55:34+5:302017-10-19T17:07:35+5:30

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर कडाडून टीका केली आहे.

Raj Thackeray 'Lakshmipujan' from cartoon! Commentary on Modi-Shah | मोदी-शहांकडे 'लक्ष्मी' मागतीये देश चालवायला पैसे; व्यंगचित्रातून राज ठाकरेंची कडाडून टीका

मोदी-शहांकडे 'लक्ष्मी' मागतीये देश चालवायला पैसे; व्यंगचित्रातून राज ठाकरेंची कडाडून टीका

Next
ठळक मुद्दे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर कडाडून टीका केली आहे. ‘लक्ष्मीपूजना’चा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी- अमित शहा या दोघांवर टीका केली आहे.

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर कडाडून टीका केली आहे. ‘लक्ष्मीपूजना’चा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी- अमित शहा या दोघांवर टीका केली आहे. गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास राज ठाकरेंनी फेसबुक पेजवर व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. 

राज ठाकरेंनी रेखाटलेल्या चित्रात कमळावर उभी असलेली ‘लक्ष्मी’ देवी पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देश चालवण्यासाठी पैसे मागताना दिसत आहे. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे पूजन करुन समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. भरभराटीसाठी लक्ष्मी प्रसन्न व्हावी, असा अनेकांचा प्रयत्न असतो. पण राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात खुद्द लक्ष्मी देवीच मोदी आणि शहांकडे देश चालवण्यासाठी पैसे मागताना दिसत आहे. समोर उभ्या असलेल्या मोदी आणि शहांकडे ‘देश चालवायला मला थोडे पैसे देता का?,’ अशी विचारणा लक्ष्मीकडून केली जात आहे.

भाजपा हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वीच चर्चेत होतं. इलेक्शन वॉच या संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या १० वर्षांमध्ये भाजपाच्या संपत्तीमध्ये तब्बल ६२५ टक्के इतकी वाढ झाली आहे. २००४-०५ मध्ये भाजपकडे १२२.९३ कोटी रूपयांची संपत्ती होती. २०१५-१६ मध्ये हा आकडा ८९३.८८ कोटींवर जाऊन पोहोचला. त्यामुळे भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्राच्या शैलीतून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फटकारलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमित शहांचा मुलगा जय शहांच्या भरभराटीचीही मोठी चर्चा आहे. जय शहांच्या ‘टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीची उलाढाल वर्षभरात तब्बल १६ हजार पटींनी वाढली आहे. विशेष म्हणजे ‘टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड’ने स्वत:हूनच ही माहिती कंपनी नोंदणी कार्यालयाला दिली आहे. जय शहांच्या या अचानक झालेल्या भरभराटीवरुन काँग्रेसने भाजपावर हल्लाबोल केला होता. त्यामुळेच अमित शहांच्या मुलाची भरभराट आणि भाजपाची श्रीमंती यांच्यावरुन राज ठाकरेंनी ‘लक्ष्मीपूजना’निमित्त्याने काढलेल्या व्यंगचित्रातून टीका केली आहे. 

Web Title: Raj Thackeray 'Lakshmipujan' from cartoon! Commentary on Modi-Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.