"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 05:21 PM2022-06-11T17:21:25+5:302022-06-11T17:22:10+5:30

शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव

Raj Thackeray Led MNS Leader Troll Shivsena CM Uddhav Thackeray after Sanjay Pawar lost Rajya Sabha Elections 2022 Results | "मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

googlenewsNext

MNS vs Shivsena Rajya Sabha Elections 2022: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जूनला मतदान झालं. यात भाजपाचे दोन तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित होता. सहाव्या जागेसाठी मात्र भाजपा विरूद्ध शिवसेना अशी लढत रंगली. त्यात भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा २ मतांनी पराभव केला आणि बाजी मारली. या पराभवानंतर भाजपा आणि इतर अनेक राजकीय पंडितांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. तसेच, शिवसेनेचे गणित नक्की कुठे बिघडले, याचाही विचार करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला. पण याचदरम्यान, मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी शिवसेनेला व उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागेल अशा पद्धतीचा फोटो पोस्ट करत त्यांना ट्रोल केलं.

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून सुरू आहे. यावरून नजीकच्या काळात भाजपा आणि मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्याला उत्तर देताना, "नाव बदलण्याची गरज काय, मी म्हणतो ना संभाजीनगर.. मग झालं", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. याच वाक्याचा आधार घेत, मनसेकडून त्यांना ट्रोल करण्यात आले. 'मी म्हणतोय ना तुला खासदार, मग जिंकायची गरज काय, आजपासून तू खासदार', असा मजकूर लिहिलेला एक फोटो अमेय खोपकर यांनी ट्वीट केला. त्या फोटोत उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांचा फोटो आहे. त्यामुळे जिव्हारी लागेल अशा प्रकारे मनसेकडून शिवसेनेला ट्रोल करण्यात आलं.

शरद पवारांकडून फडणवीस, ठाकरे दोघांचेही कौतुक

"उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं, तरी त्यांनी रिस्क घेतली. निवडणुकीत रिस्क घ्यावीच लागते. त्यांनी ते केलं त्यासाठी त्यांचं अभिनंदन. आता विधानपरिषद व राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल एकत्र बसून चर्चा करणार", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. तसेच, "भाजपाने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसं आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आलं आहे", अशा शब्दांत शरद पवार यांनी फडणवीसांचेही कौतुक केले.

Web Title: Raj Thackeray Led MNS Leader Troll Shivsena CM Uddhav Thackeray after Sanjay Pawar lost Rajya Sabha Elections 2022 Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.