'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:43 PM2023-03-09T20:43:11+5:302023-03-09T20:43:34+5:30

यावेळी मनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनांची माहिती देणारी पुस्तिका जारी करण्यात आली.

Raj Thackeray: MNS Chief Raj Thackeray LIVE speech, 'Some journalists deliberately malign the party'; Sensational claim of Raj Thackeray | 'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

googlenewsNext


मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंनीमनसेच्या आतापर्यंतच्या आंदोलनाची माहिती देणारी पुस्तिका जारी केली. यात मनसेच्या आतापर्यंतच्या सर्व आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आहे.

 "भाजपनंही हे लक्षात ठेवावं...", राज ठाकरेंनी वर्धापन दिनी दिला सूचक इशारा 

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'कोणतीही सत्ता हाती नसताना तुम्ही साथ देताय, तिच उर्जा पक्षाला पुढे नेत आहे. संदीप देशपांडेवर हल्ला झाला, ज्याने केला त्याला लवकरच समजेल. माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आलो आहोत, फडतूस लोकांकडे लक्ष देणार नाही. काहीजण बोलताता की, यांचे लोक पक्ष सोडून गेले. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण निवडणूका जिंकत नाहीत. तेरा तेव्हा 13 आमदार सोरटवरुन निवडून आले होते का..?' 

पत्रकारांचा प्रपोगंडा सुरू आहे
'हा एक प्रपोगंडा आहे. काही पत्रकार पक्षांना बांधलेले आहेत. मनसेची बदनामी करण्यासाठी पत्रकारांना पैसे दिले जातात. जाणूनबुजून चुकीचा प्रचार केला जातो आणि पक्षाची बदनामी केली जाते. ज्या पक्षाने देशावर 60-65 वर्षे राज्य केले, त्या काँग्रसची आज काय अवस्था झालीये. मला काय विचारता...त्यांना विचारा ना. भरतीनंतर ओहटी आणि ओहटीनंतर भरती येणारच...भाजपला समजायला पाहिजे. आज भरती आहे, ओहटी येऊ शकते,' असा मार्मिक टोलाही राज ठाकरेंनी यावेळी लगावला.

 '...अन् मग सगळ्यांना कळेल'; देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

राज ठाकरे पुढे म्हणतात, 'राजू पाटील एकटा पक्षाची बाजू विधानसभेत मांडतोय. एक ही है मगर काफी है. पण, काहीच समजून न घेता पक्षाबाबत चुकीचा प्रचार केला जातो. अनेकजण म्हणतात की, आम्ही आंदोलन अर्धवट सोडतो. आव्हान देतो की, एकही आंदोल अर्धवट सोडलेलं दाखवावं. आमच्या आंदोलनामुळे राज्यातले टोलनाके बंद झाले. भाजप-शिवसेनेने जाहिरनाम्यात महाराष्ट्र टोलमुक्त करू म्हटलं होतं. पण त्यांना कोणीच काही विचारत नाही,' असंही राज ठाकरे म्हणाले. 
 

Web Title: Raj Thackeray: MNS Chief Raj Thackeray LIVE speech, 'Some journalists deliberately malign the party'; Sensational claim of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.