राज ठाकरेंचा रद्द झालेला चिपळून दौरा पुन्हा ठरला; दोन दिवस, मनसेने जाहीर केले कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:28 PM2023-07-11T23:28:48+5:302023-07-11T23:29:14+5:30
तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेणार आहेत.
बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ जुलैला चिपळून दौरा आयोजित करण्यात आला होता. तो पावसामुळे रद्द करण्यात आला होता. परंतू, आज या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मनसेने दोन दिवसांची राज ठाकरेंच्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर केली आहेत.
तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेणार आहेत. राज ठाकरे १३ जुलैला चिपळून दौऱ्यावर येणार आहेत. तर १४ जुलैला ते दापोली आणि मंडणगडला जाणार आहेत.
१३ जुलैला राज ठाकरे सकाळी १० वाजता चिपळूनला येतील. १०.३० वाजता मनसेच्या कार्यालयाचे उद्धाटन करणार आहेत. यानंतर ११ वाजता अतिथी हॉलमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी ३ वाजता लोटे परशुराम येथे तलाव सुशोभिकरणाचे उद्घाटन करणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा. #मनसेचंकोकणpic.twitter.com/ursOMmu8q9
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 11, 2023
यानंतर सायंकाळी सहा वाजता खेड येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दापोली येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करतील. साडे अकरा वाजता मंडणगड येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.