"कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 08:25 PM2022-05-20T20:25:24+5:302022-05-20T20:26:34+5:30

Raju Patil : शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आता संजय राऊत यांच्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Raj Thackeray Postpond Ayodhya Visit MNS MLA Raju Patil Slam Shivsena leader Sanjay Raut | "कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

"कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल"; मनसे आमदार राजू पाटलांचा संजय राऊतांना टोला

Next

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तसेच, याबाबत राज ठाकरे रविवारी होणाऱ्या पुण्यातील सभेत बोलणार आहेत. दरम्यान, राज ठाकरेंचा दौरा स्थगित झाल्यानंतर राजकारण तापले आहे. सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच या दौऱ्यासंदर्भात शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. आता संजय राऊत यांच्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

भाजप हेच राज ठाकरेंचे प्रेरणास्थान आहे. राज ठाकरेंना पाच जूनसाठी काही सहकार्य हवे असते, तर आम्ही केले असते. अयोध्या दौरा का स्थगित केला? असा टोला संजय राऊत यांनी मनसेला लगावला होता. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. आमदार राजू पाटील म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरेंचा दौरा रद्द झाला नाही, तो पुढे ढकलण्यात आला आहे आणि आम्हाला यांची गरज नाही आहे. त्यांना कदाचित दुःख वाटलं असेल कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल. त्याचे राजकारणच हित साध्य झाले नसेल. पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल त्याचे दुःख वाटले असेल. राज साहेबांच्या तब्येतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केला आहे. राज साहेब आपली भूमिका परवा स्पष्ट करणार आहेत, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. 

'म्हणून ते एकटे जाऊ शकतात...'
काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी आम्ही अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहोत, दौऱ्यासाठी नाही, असे विधान यांनी केले होते. यावरही मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या नावातच लोंढे आहे. त्यांना लोंढे घेऊन जायची गरज नाही. म्हणून ते एकटे जाऊ शकतात. त्यांनी कसे जायचे, कसे नाही जायचे हा त्यांचा विषय आहे, असे आमदार राजू पाटील म्हणाले.

Web Title: Raj Thackeray Postpond Ayodhya Visit MNS MLA Raju Patil Slam Shivsena leader Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.