सरदार पटेलांवरून राजकारण कऱणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून पढवला इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 08:37 PM2018-02-09T20:37:34+5:302018-02-09T20:40:41+5:30

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत.

Raj Thackeray publish cartoon on Modi's statement in Lok Sabha | सरदार पटेलांवरून राजकारण कऱणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून पढवला इतिहास 

सरदार पटेलांवरून राजकारण कऱणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून पढवला इतिहास 

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत. पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केल्याने पटेलांवर अन्याय झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्यावर घणाघाती टीका करणाऱ्या मोदींना राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या नव्या व्यंगचित्रामधून इतिहास पढवला आहे.  
राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये महात्मा गांधी,  जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रकट झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी महात्मा गांधी भारताचा इतिहास नावाचे पुस्तक हातात घेऊन आपल्यासमोर बसलेल्या मोदी आणि अमित शहा यांना इतिहास पढवत असून, नेहरू यांना काँग्रेसने नव्हे तर आपणच पंतप्रधान केल्याचे सांगत असल्याचे सांगत आहेत. तसेच नेहरू हे गृहमंत्री असते तरी ते काँग्रेसचे नेते असल्याचे ठणकावत असल्याचे दाखवण्यात आले आहे. गांधीजींचे हे वक्तव्य ऐकल्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे चेहरे पाहण्यासारखे झाल्याचे दिसत आहे. 



भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना, मोदींनी दोन्ही सभागृहांत दीड तासांची भाषणे केली. त्या वेळी सभागृहांत काँग्रेस, तेलगू देसमसह अन्य विरोधकांची घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता, दरम्यान, हा विषय घेऊन राज ठाकरेंनी मोदींवर टीका केल्याने पुढच्या काही दिवसांमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

Web Title: Raj Thackeray publish cartoon on Modi's statement in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.