राज ठाकरेंनी शिवसेनेत यावे - रामदास आठवले
By admin | Published: October 4, 2015 07:27 PM2015-10-04T19:27:59+5:302015-10-04T19:39:19+5:30
द्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणारच असतील तर राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत परत यावे असे मत आरपीआय नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणारच असतील तर राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत परत यावे असे मत आरपीआय नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेना - भाजपाची युती होण्याची शक्यताही कमीच असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
रविवारी रामदास आठवले यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा रंगली आहे. याविषयी रामदास आठवले म्हणाले, जनतेला वाटत असले तरी उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे, या दोघांनी एकत्र यावे असे मलाही वाटत नाही. मात्र जर दोघे एकत्र येणारच असतील राज ठाकरेंनी शिवसेनेत परत यावे असे त्यांनी म्हटले आहे. कल्याण डोंबिवलीत भाजपाने आम्हाला २२ जागा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे आठवले यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवलीत रासप स्वबळावर लढणार
राज्यातील महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने कल्याण डोबिवलीत युतीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. रासप कल्याण डोंबिवलीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जानकर यांनी केली आहे.