राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:48 PM2022-04-21T23:48:34+5:302022-04-21T23:49:32+5:30

सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका केली होती त्यास उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे बोलत होते .

Raj Thackeray speaks the truth: Devendra Fadnavis on loudspeaker statement | राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय : देवेंद्र फडणवीस 

राज ठाकरे तेव्हा बोलायचे गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय : देवेंद्र फडणवीस 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

भिवंडी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते ,गुदगुल्या होत होत्या ,आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय अशी टीका  महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवारी रात्री ते भिवंडीतील हायवे दिवे येथे जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीच्या वतीने बनविण्यात आलेल्या कै मनीबाई मोरेश्वर पाटील बलोद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी केली.

         सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका केली होती त्यास उत्तर देताना देवेंद्र फडणवीस हे बोलत होते .राज ठाकरे सत्य बोलत असल्याने त्यांचे घाव महाविकास आघाडी सरकारच्या वर्मी लागतात. भारतीय जनता पार्टीला कोणालाही समोर करायची गरज नाही .असे सांगत भारतीय जनता पार्टी सक्षम आहे .आम्ही पोलखोल यात्रा सुरू केली आहे .दररोज पोलखोल करतोय त्यामुळे सरकार आणि सरकार मधील पक्ष व्यथित झाले आहेत.त्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत .पण आम्ही घाबरणार नाहीत त्यांनी किती ही हल्ले केले तरी आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज पोलखोल करीत राहणार असे वक्तव्य शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी  केले .

           या प्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील ,आमदार निरंजन डावखरे डावखरे,माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत पाटील,जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील,भिवंडी पालिका सभागृह नेते सुमित पाटील, संदिप लेले, माजी सरपंच सिद्धेश पाटील, दिवे अंजुर ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती पाटील, उपसरपंच अजित वसंत म्हात्रे आदी उपस्थिती होते.

Web Title: Raj Thackeray speaks the truth: Devendra Fadnavis on loudspeaker statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.