उद्यापासून कामाला लागा, राज्यातील प्रत्येक बँकेत...; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 21:27 IST2025-03-30T21:25:21+5:302025-03-30T21:27:11+5:30
Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava: मनसेचा गुढी पाडवा मेळावा आज पार पडला. यामध्ये राज ठाकरे यांनी ओरंगजेब कबरीचा काढलेला वाद, कुंभमेळा, नद्यांची परिस्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचे बलिदान आदी विषयांवर भाष्य केले.

उद्यापासून कामाला लागा, राज्यातील प्रत्येक बँकेत...; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश
टोरेस सारखी कंपनी लुटून गेली. एवढे भाबडे आहात का, कोण देते एवढे पैसे, का गुंतवता अशा ठिकाणी. तुम्हाला दोष देणार नाही. आता जी वेळ आलीय ती चांगली नाही. आज चोहुबाजुंनी महाराष्ट्राला भोंदू, फसव्यांचा विळखा पडत आहे. मराठी लोकांना विळखा पडत आहे. इकडे मुंबईत येऊन आमच्या आस्थापनांत सांगता मराठी बोलणार नाही, कानफटीतच बसणार. उद्यापासून कामाला लागा. महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत, आस्थापनेत मराठी वापरली जाते का नाही ते बघा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले.
जरा जपून म्हणून सांगायला नेमके आजच फोन आले; अर्थ मला समजतो, राज ठाकरेंनी केला गौप्यस्फोट
तसेच राज ठाकरेंनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केले. शिमगा झाला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या रितीने राज्य चालवा. निवडणुका संपल्या, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो. फडणवीस तुमच्या हातात एक चांगले सुसंस्कृत राज्य आलेले आहे. चांगल्या गोष्टीला आमचा निश्चित पाठिंबा असेल. प्रत्येक गोष्ट आम्हाला विचारून करा, असा सल्ला दिला.
मनसेचा गुढी पाडवा मेळावा आज पार पडला. यामध्ये राज ठाकरे यांनी ओरंगजेब कबरीचा काढलेला वाद, कुंभमेळा, नद्यांची परिस्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संभाजी महाराजांचे बलिदान आदी विषयांवर भाष्य केले.
'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला, इथेच गाडला'; राज ठाकरे म्हणाले औरंजेबाच्या कबरीवर बोर्ड लिहा
याचबरोबर भाषणाच्या सुरुवातीला राज यांनी गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया. आज मला खूप बोलायचे आहे. निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोन आले, नेमके आजच आले. याचा अर्थ मला समजतो. जरा जपून, असा खुलासाही राज यांनी केला.