Raj Thackeray Speech MNS Meeting : मनसेचे पदाधिकारी सुस्त पडलेत, मी ते पत्र त्यासाठीच दिलेले...; राज ठाकरेंनी बैठकीत सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:48 PM2022-08-23T13:48:39+5:302022-08-23T13:49:11+5:30
Raj Thackeray in Mumbai: राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते.
गेल्या काही वर्षांत माझ्या जवळच्या लोकांनी जी काही वाट लावलीय, त्यामुळे हिप रिप्लेसमेंटची सर्जरी केली. गेल्या वर्षी हाड पंक्चर करून इंजेक्शन दिले होते. परंतू वर्षभराने पुन्हा दुखणे बळावले. डॉक्टर म्हणाले की पहिल्या चार-पाच महिन्यात त्रास दिसतो, वर्षभराने नाही. मी उद्या पुण्याला जाऊन येणार आहे. एका दिवसासाठी. बैठका वगैरे लावू नका. मला त्रास होत नाहीय, पण एकदा तपासून पहायचे आहे. नाशिकलाही देवीच्या दर्शनाला जायचे आहे, असे राज ठाकरेंनीमनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन केले.
राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते.
खोटा प्रचार केला जातोय. तुम्ही सक्षम आहात, तुम्हाला कान आहेत, मेंदू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जी काही उत्तरे द्यावी लागतात ती थांबवा. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे, मनसे आंदोलने अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा. टोल आंदोलन आम्ही ६०-६५ टोलनाके बंद पाडले. शिवसेना-भाजपाच्या अजेंड्यात होते, त्यांना हे विचारायला जात नाहीत, सगळ्या जिल्ह्यांत टोल नाके सुरु आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
टोल नाक्यांद्वारे पैसे गोळा करतात, त्यातून निवडणुकीत केलेला खर्च काढला जातो. हे टोलनाके किती दिवस सुरु राहणार आहेत हा आपला पहिला प्रश्न होता. त्यात रोखीने पैसे येतात ते कुठे जातात याचे उत्तर आम्हाला अद्याप सरकारने दिलेले नाही. आमच्या हातात सत्ता द्या, मी बंद करून दाखवतो, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले. टोलनाकेवाले या लोकांना पैसा पुरवितात, असा आरोपही राज ठाकरेंनी केला.
भोंग्यांचे आंदोलन जे केले त्यावर पोलिसांनी म्हटलेय ९३ टक्के भोंगे बंद झालेत. जे सुरु आहेत ते कमी आवाजात अधिकृत सुरु आहेत. मी ते पत्र तुमच्या हातात दिले, मी ते सोशल मीडियावर टाकू शकलो असतो. पण तुमचा आणि लोकांचा कनेक्ट किती आहे ते मला पहायचे होते. अनेक मनसैनिकांनी मला सांगितले की आम्हाला ते पत्र मिळाले नाही नाहीतर आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवले होते. थंड पडलेत. निवडणुकीचे वारे सुरु आहेत, त्यांच्या मनात. हे जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगले नाहीय. मतदारांना कळत नसेल की कोणाला मतदान केले. हे राजकारण नाही, तर तात्पुरती आर्थिक अॅडजस्टमेंट आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
मनोहर जोशी होते...
मी बाळासाहेबांना बाहेर पडतोय म्हणून सांगायला गेलो, तेव्हा तिथे मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेले. बाळासाहेबांनी हात पसरले, मला मीठी मारली आणि मला म्हणाले जा. त्यांना समजले होते. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आम्ही जेवढी आंदोलने केलीत, तेवढी कुणीच केली नाहीत आणि यशस्वीही केली नाहीत. माझे भाषण सुरु असताना ठाण्यात खळ्ळकण आवाज आला. त्यानंतर मोबाईल कंपन्यांची पत्रे आली. एका आठवड्याची वेळ दिली, त्यानंतर महाराष्ट्रात मराठीत आवाज ऐकू येऊ लागला, असेही राज ठाकरे म्हणाले.