राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यावर
By Admin | Published: April 11, 2016 08:37 PM2016-04-11T20:37:41+5:302016-04-11T21:16:26+5:30
दुष्काळी स्थितीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळी भागाची पाहणी करणारी आहेत.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - यंदा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे. दुष्काळी स्थितीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळी भागाची पाहणी करणारी आहेत. ते मराठवाड्यातील लातूर, बीड. उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद जिल्ह्याला भेट देणार आहेत. १९ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान त्यांचा दुष्काळ दौरा आयोजित करण्यात आला आहे. गतवर्षीपेक्षाही यावर्षी मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. मागील २ वर्षापासून अपुऱ्या पावसामुळे आणि कर्जबारीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत.
१० दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यात राज ठाकरे रोजगार हमी योजनेच्या कामास भेट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियास तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांना भेटी देणार आहेत. शेतकरी, शेतमजूर यांच्याशी संवाद साधून ग्रामीण भागातील समस्या ते जाणून घेणार आहेत.