ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल

By admin | Published: October 14, 2014 06:29 PM2014-10-14T18:29:31+5:302014-10-14T18:29:31+5:30

महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत.

Raj Thackeray tops in online search | ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल

ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपने सोशल मिडीयावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे. 
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर केल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही सर्वच पक्षांनी सोशल मिडीयावरील प्रचारावर भर दिला होता.  गुगलने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. गुगल या सर्च इंजिनमध्ये राज ठाकरे यांच्या नावाने सर्वाधिक सर्च दिला गेला असून त्याखालोखाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा क्रमांक लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हेदेखील ऑनलाइन जगतामध्ये लोकप्रिय ठरले असले तरी ठाकरे बंधूंना मागे टाकण्यात ते अपयशी ठरले आहेत. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या नावाने सर्च देण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

Web Title: Raj Thackeray tops in online search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.