राज ठाकरे शांत बसणाऱ्यांपैकी नाही, आशिष शेलारांचा सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 03:10 PM2019-09-29T15:10:37+5:302019-09-29T15:22:20+5:30
मुंबई - लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीत काय रणनीती असणार आहेत, याकडे ...
मुंबई - लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीत काय रणनीती असणार आहेत, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते आपले उमेदवार उतरवणार की नाही यावरून तर्कवितर्क लावले जात असताना, राज ठाकरे हे शांत बसणार नाहीत असा सूचक इशारा भाजपचे नेते व शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे हे काय निर्णय घेणार यासाठी संपूर्ण राज्याचे लक्ष उद्या होणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्या मेळाव्याकडे लागले आहेत. मात्र त्यापूर्वीच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल बोलताना राज ठाकरे गप्प बसणार नसल्याचे म्हंटले आहे. 'ईडी'च्या चौकशी नंतर राज ठाकरे म्हणाले होते की, गप्प बसणार नाही. मात्र त्यांनतर ते अजून तरी ते शांत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना शेलार म्हणाले की, राज यांचा व्यक्तिगत स्वभाव जो मला माहित आहे, त्यानुसार ते गप्प बसणार नाहीत.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, खोटारड्या विधानांच्या आधारावर प्रचार करणाऱ्याची भूमिका जर राज ठाकरे यांनी घेतली तर त्यांना मी आजचं उत्तर देतो की, 'अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त' असे म्हणत त्यांनी राज यांच्यावर टीका केली. लोकशाहीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपल्या मतांचा प्रचार करावा पण खोटु बोलू नयेत असा टोला सुद्धा शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला.
विधानसभा निवडणुकीत मनसेला किती जागांवर विजय मिळू शकते या प्रश्नाला उत्तर देतांना शेलार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या किती जागा येतील त्यापेक्षा ते निवडणूक लढवतील की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. तसेच आम्ही कुणाची चिंता करत नसून आम्हाला सगळ्यांचा सन्मान असल्याचे सुद्धा शेलार यावेळी म्हणाले.