राज ठाकरेंचे आगमन - आज मुलाखती

By admin | Published: August 24, 2014 01:13 AM2014-08-24T01:13:36+5:302014-08-24T01:13:36+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे शनिवारी रात्री मुंबईहून नागपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या निनादात स्वागत केले.

Raj Thackeray's arrival - Today's interview | राज ठाकरेंचे आगमन - आज मुलाखती

राज ठाकरेंचे आगमन - आज मुलाखती

Next

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे शनिवारी रात्री मुंबईहून नागपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या निनादात स्वागत केले.
राज यांच्या स्वागतासाठी विमानतळावर विदर्भाच्या विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.त्यात महिलांचाही समावेश होता. राज विमानतळाबाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यांच्यासोबत आमदार बाळा नांदगावकर व पक्षाचे सरचिटणीस अजित अभ्यंकर होते. विमानतळावरून ते थेट रविभवनमध्ये गेले.रविवारी सकाळी ८ वाजता पासन ते विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. विमानतळावर मनसेचे पदाधिकारी अनुक्रमे हेमंत गडकरी, प्रशांत पवार, प्रवीण बरडे,अविनाश जाधव, विशाल बरबटे, मनीष देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Raj Thackeray's arrival - Today's interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.