आगामी काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढणार; ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवली भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 10:15 AM2022-04-30T10:15:39+5:302022-04-30T10:15:54+5:30

निर्णय प्रक्रिया लांबल्याने सरकारला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं.

Raj Thackeray's influence will increase in the coming period; Predictions made by astrologers | आगामी काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढणार; ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवली भविष्यवाणी

आगामी काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढणार; ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवली भविष्यवाणी

googlenewsNext

नाशिक – तब्बल २९ वर्षांनी शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या काळात वैश्विक पातळीवर काही शुभ-अशुभ घटना घडू शकतील असा अंदाज ज्योतिष अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कुंभ राशीतून शनी भ्रमण करताना शुभ परिणाम होता. शनीला न्यायदेवता म्हटलं जातं. १२ जुलै २०२२ पर्यंत शनी भ्रमण होणार आहे. भारत मकर राशीत येतो. जागतिक स्तरावर भारत आर्थिक प्रबळ बनेल असा ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केले आहे.

शनी कुंभ, मकर, तूळ आणि वृषभ राशींसाठी फलदायक ठरणार आहे. ८४ दिवसांत शेअर मार्केट उच्चांक पातळी गाठेल. भारताची आर्थिक स्थिती सुधारेल. महागाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत सकारात्मक घटना घडतील. महाराष्ट्रातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे(सिंह), शरद पवार(कन्या) यांनी आरोग्यविषयक काळजी घेणे गरजेचे आहे. निर्णय प्रलंबित ठेवल्याने लोकांमध्ये असंतोषता वाढेल. लोकहिताचे निर्णय सरकारनं घ्यावेत. निर्णय प्रक्रिया लांबल्याने लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं.

या काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढेल. जनमानसात प्रतिमा वाढेल. कुंभ राशीतील शनी राज ठाकरेंसाठी फायदेशीर ठरणार आहे. २०२३ नंतर देवेंद्र फडणवीस हे सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा काळ प्रभावी ठरणार आहे असा अंदाज डॉ. नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केला. तसेच जागतिक कोरोना महामारी १३ जुलैपर्यंत भारतावर कुठलाही जास्त परिणाम जाणवणार नाही. आर्थिक स्थिती सुधारल्याने जनमाणसांत समाधान असेल. पुढचे ८४ दिवस महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता वाढवणारे असतील असंही धारणे गुरुजींनी सांगितले आहे.    

Web Title: Raj Thackeray's influence will increase in the coming period; Predictions made by astrologers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.