राज ठाकरेंच्या ‘मातोश्री समूहा’ने सीकेपी बँकेचे 27 कोटी थकविले

By admin | Published: June 7, 2014 01:28 AM2014-06-07T01:28:02+5:302014-06-07T01:29:29+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘मातोश्री रिअॅल्टर्स’ या समूहाने सीकेपी सहकारी बँकेचे 27 कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे,

Raj Thackeray's 'Matoshree Group' tired of 27 crore CKP Bank | राज ठाकरेंच्या ‘मातोश्री समूहा’ने सीकेपी बँकेचे 27 कोटी थकविले

राज ठाकरेंच्या ‘मातोश्री समूहा’ने सीकेपी बँकेचे 27 कोटी थकविले

Next
>चार कंपन्या डीफॉल्टर : विकासाचा ब्ल्यूप्रिंट नंतर करा आधी कर्ज तर फेडा - ठेवीदारांचा टाहो
नंदकुमार टेणी - ठाणो
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘मातोश्री रिअॅल्टर्स’ या समूहाने सीकेपी सहकारी बँकेचे 27 कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे, असे बँकेच्या बुडीत कर्जाच्या यादीवरून स्पष्ट होत आहे. किंबहुना बँक डबघाईला येण्यास ही थकबाकी प्रामुख्याने कारणीभूत आहे.
ही बँक चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजाची हक्काची समजली जाते. तिच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीव होता. या बँकेच्या प्रशासक मंडळाने वसुलीसाठी दादर विभागातील बडय़ा बुडीत कजर्दारांची यादी तयार केली आहे. त्यात मातोश्री रिअॅल्टर्सचा उल्लेख अग्रभागी आहे. एलएनटीडी/ 1316 क्रमांकाच्या नावे असलेल्या या खात्यामधील कर्ज रक्कम 6क् कोटी रुपये एवढी आहे. हे कर्ज 15 मार्च 2क्क्8 रोजी देण्यात आले होते. परतफेडीची मुदत 11 सप्टेंबर 2क्क्9 होती. परंतु 11 कोटी 78 लाख 6 हजार 159 रुपये थकीत कर्ज दाखविले आहे. त्यानंतर 5 कोटी रुपयांचा चेक राज यांच्या कंपनीने अदा केला आहे. याच कंपनीला कॅश क्रेडिट स्वरूपाचे याच बँकेने कर्ज दिले असून त्याचा खाते क्रमांक सीसी/31क्
 आहे. 1 जानेवारी 2क्12 रोजी मर्यादेनुसार 6 कोटी 1क् लाखांचे हे कर्ज मंजूर झाले. या खात्यावर आता 6 कोटी 45 लाख 28 हजार 1क्6 रुपये रक्कम थकीत आहे. 
याशिवाय ‘मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला कॅशक्रेडिट स्वरूपात 5 कोटींचे कर्ज मंजूर झाले. त्याचा खाते क्रमांक सीसी/432 हा आहे. 9 मार्च 2क्11 रोजी ते मंजूर झाले. त्यापैकी एक पैसाही परत केला गेला नाही. याच कंपनीला 1 जानेवारी 2क्12 रोजी 1 कोटी 4क् लाखांचे  कर्ज मंजूर झाले. त्याचा खाते क्रमांक सीसी/415 आहे. या खात्यावर आज 87 लाख 75 हजार 623 एवढे कर्ज आहे. मातोश्री प्रॉपर्टीज या कंपनीला अशाच स्वरूपाचे दीड कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आले असून त्याचा खाते क्र. सीसी/428 आहे. 29 एप्रिल 2क्11 रोजी ते मंजूर झाले. त्याचीही परतफेड शून्य आहे. 
मातोश्री इंजिनिअर्सला 6 कोटी 25 लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्या पैकी 5 कोटी 32 लाख 55 हजार 86 एवढी थकबाकी आहे. त्याचा खाते क्रमांक एलएनपीआरओ/4क्9 असा आहे. हे कर्ज 3क् मार्च रोजी वितरीत झाले होते. या सर्व खात्यातील थकीत रक्कम 27 कोटी 33 लाख 64 हजार 974 एवढी होते. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेची कुतरओढ सुरू आहे. आयुष्यभराची पुंजी ज्यांनी या बँकेत ठेवली ते ठेवीदार आता देशोधडीला लागले असून ज्यांचा या बँकेत दमडाही ठेव म्हणून नाही, अशा अनेक बडय़ांनी बँकेची रक्कम कर्ज रुपाने घेऊन बुडवली आहे. त्यामुळे अनेकांवर ‘मरण बरे वाटते’, अशी स्थिती ओढवली आहे. 
 
राज आज कल्याण कोर्टात
कल्याण : 2क्क्8 मध्ये घेण्यात आलेल्या रेल्वे भरतीसाठी परप्रांतातून आलेल्या परीक्षार्थीना डोंबिवलीतील विविध परीक्षा केंद्रावर झालेल्या मारहाणी प्रकरणी मनसेच्या 16 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या गुन्ह्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना सहआरोपी करण्यात आले होते. त्याच्या सुनावणीसाठी शनिवारी राज ठाकरे कल्याण न्यायालयात हजर राहणार आहेत.
 
5 कोटी फेडले 1क् महिन्यांत 21.5 कोटीही फेडू - राजन शिरोडकर
या वृत्ताबाबत मातोश्री समूहाचे सूत्रधार राजन शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मातोश्री समूहातील फक्त मातोश्री रिअॅल्टर्स या एकाच कंपनीशी राज ठाकरे यांचा संबंध आहे. बाकीच्या तीन कंपन्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही. 
 
 ते खाते वगळता अन्य तीन खाती सीसी म्हणजे कॅश क्रेडिट स्वरूपाची आहेत. या सीसीचे नूतनीकरण दरवर्षी केले जात असते. तसा अर्ज आम्ही बँकेकडे केलेला आहे. बँकेचे स्टेटमेंट पाहिले तर असे लक्षात येते की आम्ही सीसीच्या व्याजाचा एक पैसाही थकविला नाही. 
 
कोणत्याही व्यवसायातून एकदम 27 कोटी रुपये काढून देणो शक्य होत नाही. कारण सीकेपी बँकेवर रिझव्र्ह बँकेने केलेली कारवाई अचानक केली आहे. त्यानंतर बँकेने आम्हाला नोटीस पाठविली असता आम्ही बँकेला विनंती केली आहे की, आम्हाला ही सगळी रक्कम फेडण्यासाठी 9 ते 1क् महिन्यांची मुदत द्या. त्यानुसार आम्ही 24 मे रोजी 5 कोटी रुपये फेडले आहेत व उर्वरित 21.5 कोटी आम्ही उर्वरित काळात फेडणार आहोत.

Web Title: Raj Thackeray's 'Matoshree Group' tired of 27 crore CKP Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.