राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस
By admin | Published: October 14, 2014 02:15 AM2014-10-14T02:15:03+5:302014-10-14T02:15:03+5:30
प्रचारसभेतील भाषणात अमराठी लोकांविरुद्ध काढलेले उद्गार आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावली.
Next
आचारसंहिता भंगाचा ठपका : अमराठी लोकांविरोधात केले होते वक्तव्य
मुंबई : प्रचारसभेतील भाषणात अमराठी लोकांविरुद्ध काढलेले उद्गार आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावली. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आयोगाने राज यांना गुरुवारी सकाळर्पयतचा अवधी दिला आहे. या कालावधीत उत्तर न आल्यास थेट कारवाईचाही इशारा आयोगाने दिला आहे. नोटिशीसोबत राज यांच्या घाटकोपर येथील भाषणाचे इंग्रजी शब्दांकन पाठविले आहे.
घाटकोपरच्या सभेत काय म्हणाले होते राज
सत्ता दिल्यास पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व नोक:या केवळ मराठी तरुण-तरुणींना देऊ. परराज्यातील कोणालाच नोकरी मिळणार नाही. परराज्यातील लोंढे थांबवू. ज्या ट्रेनने ते येत असतील, त्यातच त्यांची चौकशी सुरू होईल.
राहण्याची आणि कामाची सोय नसेल तर महाराष्ट्रात येऊ नका. महाराष्ट्राने तुम्हाला पोसण्याचा ठेका घेतलेला नाही; केवळ मराठींनाच नोक:या मिळायला हव्यात.’
कल्याण येथील भाषणातही राज ठाकरेंनी अशीच अमराठी
लोकांविरुद्ध वक्तव्ये केल्याचे आयोगाने नमूद केले आहे.