कॅम्पाकोलावर कारवाईला राज ठाकरेंचा विरोध
By admin | Published: June 10, 2014 04:22 PM2014-06-10T16:22:44+5:302014-06-10T16:22:44+5:30
मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनीही लता मंगेशकर यांच्या सूरात सूर मिसळत कॅम्पा कोलावरील कारवाईला विरोध दर्शवला आहे.
Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १० - मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनीही लता मंगेशकर यांच्या सूरात सूर मिसळत कॅम्पा कोलावरील कारवाईला विरोध दर्शवला आहे. अनधिकृत बांधकांमांसाठी जबाबदार असलेल्या बिल्डर, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कॅम्पा कोला इमारतीतील बेकायदेसीर मजल्यांवर हातोडा पडणार हे स्पष्ट झाल्यावर सोमवारी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पा कोलावर कारवाईला विरोध दर्शवला होता. यानंतर मंगळवारी मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनीही कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला आहे. रहिवासी अनधिकृत बांधकामांना जबाबदारी नाहीत. या बांधकामांसाठी जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिका-यांवर कारवाई केली नाही तर अशी बांधकाम फोफावतच राहतील असे राज ठाकरेंनी सांगितले.
राज्य सरकारने ४४ टोलनाके बंद करण्याच्या निर्णयावर राज ठाकरे म्हणाले, ४४ टोल नाके बंद करण्याच्या निर्णयावर आता आनंद व्यक्त करणार नाही. टोलवसूलीत पारदर्शकतेचा अभाव आहे. राज्य सरकारने यापूर्वीही ६४ टोलनाके बंद करण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने टोलधोरण स्पष्ट करणे गरजेचे असून टोलनाके बंद करण्याची घोषणा फसवीच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.