दिल्लीत जाणे हा राज ठाकरेंचा अधिकार; इतिहासात महाराष्ट्रद्रोही नोंद होईल; राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:52 AM2024-03-19T10:52:43+5:302024-03-19T10:56:32+5:30
Sanjay Raut on Raj Thackeray Delhi Visit: राज ठाकरे दिल्लीत. राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची शक्यता.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युती करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत गेले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली वारीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
राज ठाकरे महायुतीत गेल्याने मविआवर काही फरक पडणार नाही. दिल्लीत जाणे हा राज ठाकरेंचा अधिकार. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असतील तर अशा नेत्यांची, पक्षांची राज्याच्या इतिहासात भुमिका महाराष्ट्र द्रोही अशी लिहीली जाईल. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर प्रेम आहे. ते असा निर्णय घेणार नाहीत, असे राऊत म्हणाले.
शिवसेना फोडली तरी फायदा झाला नाही. आमची मते फोडायची आहेत. रात्री त्या नेत्यांना भेट मिळाली नाही. सकाळी बोलावले, असे कळले आहे. मविआला यश मिळतेय हे पाहून राजकीय कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
तसेच नाना पटोलेंनी सांगली मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असेल असे म्हटल्यावरून आम्हाला भाजपाचा पराभव सर्व पातळ्यांवर करायचा आहे. नाना पाटोलेंनी जरा संयमाने बोलले पाहिजे. कोणाला भाजपला मदत करून काही साध्य करायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे प्रत्यूत्तर दिले.
प्रकाश आंबेडकरांना अल्टीमेटम?
प्रकाश आंबेडकर यांना अल्टीमेटम देण्याचा प्रश्न नाही. ते नेते आहेत. त्यांचा पक्ष आहे. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. हे प्रस्ताव मागेपुढे होत असतात. राजू शेट्टींना हातकणंगलेत पाठिंबा दिलेला आहे. अशा चर्चा निवडणुकीत होत असतात. जागा वाटप