राज ठाकरे यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच -जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 03:59 PM2021-02-07T15:59:52+5:302021-02-07T16:00:00+5:30

Jayant Patil on Raj Thackeray राज ठाकरे वीज बिलाच्या प्रश्नावर बेछुट आराेप करतात, असा टाेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला

Raj Thackeray's statement only for publicity - Jayant Patil | राज ठाकरे यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच -जयंत पाटील

राज ठाकरे यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच -जयंत पाटील

Next

अकाेला : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे त्यामुळे ते राज्यातील वीज बिलाच्या प्रश्नावर बेछुट आराेप करतात, असा टाेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यासाठी रविवारी अकाेल्यात आले हाेते. त्यांनी सकाळी जलसंपदा विभागाचा आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की,  वीज बिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभिर आहे मात्र एवढया महत्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीज बीलाचा प्रश्न मागे पडला असे विधाान करणे हस्यास्पद असल्याचे पाटील म्हणाले. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे. त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे असा टाेलाही त्यांनी लगावला. सध्या दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदाेलन हे आणखी तीव्र झाले असून त्या आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठीच शनिवारी झालेला चक्का जाम यशस्वी झाला असा दावा त्यांनी केला. केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशिल नसल्याचा आराेपही त्यांनी केला. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाबाबत बदललेल्या परिस्थितीत तिन्ही पक्ष चर्चा करून निर्णय घेतील असं म्हणत पाटील यांनी अध्यक्षपदाबाबत गुढ आणखी वाढवले आहे. यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री डा राजेंद्र शिंगणे आमदार अमाेल मिटकरी आ नितिन देशमुख आदी उपस्थीत हाेेते.

 

फडणवीसांचे विधान गांभिर्याने घेत नाही

विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्याचे राज्य सरकारमध्ये विना शिडीचे फासे पलटवू असे विधान केले हाेते. या संदभार्त जयंत पाटील यांना विचारणा केली असता फडणवीस यांना एक व्यक्तीम्हणून मी गांभिर्याने घेताे मात्र त्यांचे विधान गांभिर्याने घेत नाही असा टाेला लगावला.

 

भाजप नेत्यांनी शहाणपणा शिकवू नये

इंधन दरवाढीवर केंद्राने कर कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं अशावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचं शहाणपण शिकवू नये असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. केंद्राने एक रूपया जरी कमी केला तर करात माेठा दिलासा मिळेल असेही त्यांनी सुनावले.

Web Title: Raj Thackeray's statement only for publicity - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.