राज ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरली; मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, जोरदार शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:28 PM2022-10-20T12:28:00+5:302022-10-20T12:29:27+5:30

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निरिक्षकपदाची जबाबदारी दिली होती.

Raj Thackeray's strategy was successful; Entry of party workers from other parties into MNS | राज ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरली; मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, जोरदार शक्तिप्रदर्शन

राज ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरली; मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, जोरदार शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

पुणे - मनसे प्रमुख राज ठाकरे हे पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी राज ठाकरे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून राज यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरलं आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील इतर पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी हे मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे. पुणे मनसे मध्यवर्ती शहर कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निरिक्षकपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर आता खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशीतील कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत प्रमुख नेते शहर मध्यवर्ती कार्यालयात उपस्थित आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघावर मनसेने लक्ष केले आहे. मनसेत पक्षप्रवेश करताना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यात पै.आप्पा आखाडे, समीर कुटे ,राहुल वाल्हेकर, संदीप तागुंदे यांचा समावेश आहे. 

आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात मनसेही सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते, सरचिटणीस यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले. त्यात पुणे ग्रामीण भागातील मावळ, शिरुर आणि बारामती लोकसभेसाठी पक्षाने पुण्यातील नेत्यांना जबाबदारी दिली होती. वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. 

वसंत मोरे यांना पक्षाने पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मात्र मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत मशिदीवरील भोंगे हटवण्याचं आंदोलन हाती घेतलं. त्यावर मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली. मोरे यांच्याजागी साईनाथ बाबर यांना शहराध्यक्षपदी नेमण्यात आले.

वसंत मोरे मनसे सोडणार अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवसेना, भाजपासह अनेक पक्षांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. परंतु वसंत मोरे हे राज ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. शिवतीर्थवरील बैठकीत वसंत मोरे यांची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश आले. त्यानंतर कात्रज भागात मनसेचे नगरसेवक निवडून आणणार या भूमिकेतून ते काम करू लागले. त्यातच वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी नवी जबाबदारी देत बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून पाठवलं. त्यानंतर हा भव्यदिव्य प्रवेश सोहळा पार पडत आहे. 
 

Web Title: Raj Thackeray's strategy was successful; Entry of party workers from other parties into MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.