Raj Thackeray: शिवसेना सोडली तेव्हा...; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली बाळासाहेबांसोबतच्या त्या भेटीची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:01 PM2022-08-23T14:01:23+5:302022-08-23T14:02:01+5:30

Raj Thackeray News: गेली दोन अडीच वर्षे जे चालू आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना सोडताना घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. 

Raj Thackray: When Shiv Sena left...; Raj Thackeray told the story of that meeting with Balasaheb for the first time | Raj Thackeray: शिवसेना सोडली तेव्हा...; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली बाळासाहेबांसोबतच्या त्या भेटीची गोष्ट

Raj Thackeray: शिवसेना सोडली तेव्हा...; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली बाळासाहेबांसोबतच्या त्या भेटीची गोष्ट

googlenewsNext

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सडकून टीका केली. गेली दोन अडीच वर्षे जे चालू आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना सोडताना घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. 

राज ठाकरे शिवसेना सोडताना घडलेल्या घडामोडींदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या भेटीबाबत भावूक आठवण सांगितली. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एका चॅनेलला मुलाखतीत मला प्रश्न विचारला गेला, शिवसेनेतून भुजबळ बाहेर पडले, राणे बाहेर पडले, तुम्ही बाहेर पडलात. तेव्हा मी म्हणालो की हे सर्वजण बाहेर पडले ते दुसऱ्या पक्षात सत्तेमध्ये गेले. मी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष उभा केला. 

मी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो. शिवसेनेतून बाहेर पडतोय हे सांगण्यासाठी मी बाळासाहेबांकडे गेलो होतो. तेव्हा तिथे मनोहर जोशी उपस्थित होते. ते खोलीच्या बाहेर गेले. मनोहर जोशी बाहेर गेल्यानंतर तिथे मी आणि बाळासाहेब ठाकरे असे दोघेच होतो. तेव्हा बाळासाहेबांनी हात पसरले. मला मिठीत घेतले आणि म्हणाले की आता जा. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला, असे राज ठाकरे म्हणाले.  

Web Title: Raj Thackray: When Shiv Sena left...; Raj Thackeray told the story of that meeting with Balasaheb for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.