राज-उद्धव एकत्र येऊ शकतात

By admin | Published: September 30, 2014 02:42 AM2014-09-30T02:42:07+5:302014-09-30T02:42:07+5:30

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार हे एकमेकांचे हाडवैरी जर एकत्र येऊ शकतात तर राज आणि उद्धव हे भाऊ आहेत.

Raj-Uddhas can be combined | राज-उद्धव एकत्र येऊ शकतात

राज-उद्धव एकत्र येऊ शकतात

Next
>नांदगावकरांचा गौप्यस्फोट
मुंबई : भाजपाने बिहार, हरियाणा या राज्यांत आपल्या मित्रपक्षांना गिळले. तीच रणनीती महाराष्ट्रात अंमलात आणून शिवसेनेला गिळण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दांत भाजपावर निशाणा साधतानाच बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार हे एकमेकांचे हाडवैरी जर एकत्र येऊ शकतात तर राज आणि उद्धव हे भाऊ आहेत. आपण भविष्यवेत्ता नाही, परंतु हे दोघेही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोट  विधानसभेतील मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला.  
प्रश्न- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या निवडणुकीत कुठेच चर्चा नाही. त्याची कारणो काय?
नांदगावकर-  लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना मनसेने पाठिंबा दिला. थेट मोदींना मत द्यायचा पर्याय असताना राज यांना कशाला मत द्यायचे, असा विचार मतदारांनी केला. मात्र आता राज यांनी आपली ब्ल्यू प्रिंट जाहीर केली असून आता ते प्रचाराकरिता बाहेर पडणार आहेत. मनसेची ब्ल्यू प्रिंट अमलात आणली तर महाराष्ट्रातील प्रश्न संपून जातील. आजही आरोग्य, शिक्षण, झोपडपट्टीवासीयांना घरे याच प्रश्नांची आपण चर्चा निवडणुकीत करतो. 25 वर्षाची युती आणि 15 वर्षाची आघाडी तुटल्याने आता या पक्षांचे नेते परस्परांना शिव्या घालत असताना केवळ आमच्या नेत्याकडे विकासाची व्हीजन आणि आत्मविश्वास आहे.
प्रश्न- भाजपाने शिवसेनेबरोबर विश्वासघात केला हा उद्धव यांचा दावा पटतो का?
नांदगावकर- ज्या राज्यात भाजपा मित्रपक्षांचे बोट धरून गेला त्या राज्यांत भाजपाने मित्रपक्षाला गिळले. बिहार, हरियाणा अशा राज्यांत त्याचे प्रत्यंतर आले आहे. भाजपावर विश्वास ठेवण्यासारखे त्यांचे वर्तन नाही. भाजपाबरोबरची युती तुटल्याने आता कोण कुठे आहे ते महाराष्ट्राला कळेल.
प्रश्न- ब्ल्यू प्रिंटमधील महाराष्ट्राच्या स्वायत्ततेची मागणी ही देश एकसंध ठेवण्याच्या मनसेच्या मूलभूत भूमिकेशी विसंगत नाही का?
नांदगावकर- महाराष्ट्राला निर्णयाची स्वायत्तता देण्याची ही मागणी आहे. रेल्वे असो की अन्य खाती सतत केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहत राहणो चुकीचे आहे. रेल्वे बोर्डाकडे असलेले मंजुरीचे अधिकार महाराष्ट्रात असले पाहिजेत. मुंबईतून हजारो कोटी रुपये कररुपाने केंद्र सरकारला मिळतात. त्यापैकी किती वाटा या शहराला मिळतो. सतत दिल्लीकडे आशाळभूतपणो पाहणो आम्हाला मान्य नाही.
प्रश्न- मनसेने किती उमेदवार उभे केले व त्यापैकी किती विजयी होतील, अशी अपेक्षा आहे?
नांदगावकर- मनसेने 23क् उमेदवार उभे केले असून त्यापैकी किमान 4क् ते 45 उमेदवार विजयी होतील.
प्रश्न- लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यापुढे राज यांचा करिष्मा फिका पडला. विधानसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होणार नाही का?
नांदगावकर- लोकसभा निवडणुकीत मनसेने मोदींना मदत केली. आता तसे होणार नाही. राज यांची लोकप्रियता वाढत असून विकास व सुशासन याबाबत लोकसभा निवडणुकीत मोदींची भूमिका जशी मतदारांना प्रामाणिक वाटली तशीच विधानसभा निवडणुकीत राज यांची भूमिका मतदारांना प्रामाणिकपणाची वाटेल.
 
मुंबई-राज्यात कुणाची सत्ता आणायची हे यावेळी मनसे ठरवेल. तसे झाल्यास मनसेच्या ब्ल्यू प्रिंटमधील विषय आमच्याकरिता महत्वाचे असतील. त्यामुळे राज्यातील दुष्काळ संपुष्टात आणावा, महिलांचे सबलीकरण, झोपडपट्टीमुक्त मुंबई अशा मागण्यांकरिता आम्ही आग्रह धरणारच. मात्र कुठल्या पक्षाबरोबर जायचे की विरोधी पक्षात बसायचे त्याचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील , असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
- संदीप प्रधान
 
 
 

Web Title: Raj-Uddhas can be combined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.