दिवाळीनंतर राजन मुंबईत?
By admin | Published: November 3, 2015 04:06 AM2015-11-03T04:06:12+5:302015-11-03T04:06:12+5:30
कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फ राजन निकाळजेला ताब्यात घेण्यास केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेचे (सीबीआय) एक पथक इंडोनेशियाला गेले असले तरी त्याला भारतात कधी आणले जाईल, याबाबतची
मुंबई : कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फ राजन निकाळजेला ताब्यात घेण्यास केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेचे (सीबीआय) एक पथक इंडोनेशियाला गेले असले तरी त्याला भारतात कधी आणले जाईल, याबाबतची कमालीची गुप्तता पाळली जात आहे. राजनला भारतात आणले तरी मुंबई पोलिसांपूर्वी सीबीआय व राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) त्याची पहिल्यांदा चौकशी केली जाण्याची शक्यता मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. पुढच्या टप्प्यात त्याला मुंबई पोलिसांकडे सुपुर्द केले जाईल. मुंबई पोलिसांकडे राजनचा ताबा दिवाळीनंतरच येईल, असे सूत्रांनी सांगितले.
ताबा मिळाल्यावर एनआयए व सीबीआयचे पथक त्याला ताब्यात घेईल. देशद्रोह, आंतरराष्ट्रीय व दिल्लीतील गंभीर गुन्ह्यांबाबत चौकशी होईल. त्यानंतरच त्याचा ताबा मुंबई पोलिसांकडे दिला जाईल, असे सांगण्यात आले. मुंबईत आणल्यावर राजनला पुरेशा सुरक्षेत ठेवण्याच्या दृष्टीनेदेखील आढावा घेतला जाईल, असे सहआयुक्त (गुन्हे) धनंजय कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)
चार पासपोर्ट
छोटा राजनकडे ४ पासपोर्ट असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. पहिला पासपोर्ट त्याने १९८४ मध्ये स्वत:च्या नावावर मुंबईतून मिळविला. त्यानंतर १९८८मध्ये दुसरा, तर १९९८ व २००८मध्ये अनुक्रमे हरारे व सिडनी येथून त्याने बनावट पासपोर्ट बनविले.